हिलरी क्लिंटन यांना न्यूमोनियाची लागण

वृत्तसंस्था
सोमवार, 12 सप्टेंबर 2016

न्यूयॉर्क - अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना न्यूमोनियाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून, डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

रविवारी अमेरिकेवर 9 सप्टेंबर 2001 मध्ये झालेल्या हल्ल्याला 15 वर्षै पूर्ण झाली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. पण, प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना कार्यक्रमातून निघून गेल्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना खोकल्याचा त्रास होत होता. त्यामुळेच त्यांना न्यूमोनियाची लागण झाल्याचे, त्यांच्या डॉक्टर लीस बर्डाक यांनी सांगितले.

हिलरी क्लिंटन या सध्या प्रचारसभांमध्ये व्यस्त आहेत. मात्र, डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे. रविवारी कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वीच त्यांना ताप होता. त्यांच्या शरीरातील पाणी कमी झाल्याने, त्यांना कार्यक्रम सोडून जावे लागले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हिलरी क्लिंटन यांच्यासमोर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचे आव्हान आहे.

Web Title: Hillary Clinton down with pneumonia