बॅंकॉकमध्ये रुग्णालयात बॉम्बस्फोट; 24 जखमी

वृत्तसंस्था
सोमवार, 22 मे 2017

बॅंकॉक (थायलंड)- शहरामध्ये असलेल्या फ्रामगुटस्कलाओ या रुग्णालमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये 24 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी आज (सोमवार) दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रामगुटस्कलाओ या रुग्णालयामध्ये लष्करातून निवृत्त झालेल्या अधिकाऱयांवर उपचार केले जातात. लष्करातील अधिकाऱयांवर उपचारासाठी हे रुग्णालय प्रसिद्ध आहे. रुग्णालयात आज बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला. यामध्ये 24 जण जखमी झाले आहेत.

रुग्णालयात तपासणीदरम्यान बॉम्ब तयार करण्याच्या वस्तू आढळून आल्या आहेत. याबाबत पुढील तपास सुरू आहेत. अद्याप कोणत्याही संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

टॅग्स