पाकिस्तानी व्हिसांवरही बंदी घाला- इम्रान खान

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

इस्लामाबाद- डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसावर बंदी घालावी, जेणेकरून त्यानंतर तरी येथील प्रशासन देश सुधारण्यावर लक्ष देईल, अशी उपहासात्मक टीका माजी क्रिकेटपटू व पाकिस्तान तेहरीक-ई-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांनी केली आहे. 

इस्लामाबाद- डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसावर बंदी घालावी, जेणेकरून त्यानंतर तरी येथील प्रशासन देश सुधारण्यावर लक्ष देईल, अशी उपहासात्मक टीका माजी क्रिकेटपटू व पाकिस्तान तेहरीक-ई-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांनी केली आहे. 

ट्रम्प यांच्या स्थलांतर बंदीसंदर्भातील आदेशामुळे मुस्लिमांना अमेरिकेत प्रवेश करण्यापासून रोखण्यात येत असल्याचा निषेध त्यांनी केला. त्यावेळी बोलताना त्यांनी पाकिस्तान सरकारवरही टीका केली. 
"आज मी सर्व पाकिस्तानी लोकांना सांगू इच्छितो की, माझी अशी प्रार्थना आहे की ट्रम्प यांनी पाकिस्तानी व्हिसांवर बंदी घालावी जेणेकरून आपण आपल्या देशातील समस्या सोडविण्यावर लक्ष केंद्रीत करू शकू," असे खान यांनी 'डॉन' या पाकिस्तानी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले. 

ट्रम्प यांनी शुक्रवारी काढलेल्या आदेशानुसार जगभरातील सात मुस्लिम देशांतून येणाऱ्या निर्वासितांच्या अमेरिका प्रवेशावर 90 दिवसांची बंदी घालण्यात आली आहे. इराक, सीरिया, इराण, येमेन, सुदान, लिबिया आणि सोमालिया या देशांचा यामध्ये समावेश असून, सीरियन निर्वासितांवर कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली आहे. 
 

ग्लोबल

टोकियो - डोकलाम येथील भारत-भूतान-चीन या ट्रायजंक्‍शनजवळ भारतीय लष्कर व चिनी सैन्य...

10.57 AM

बार्सिलोना - स्पेनमधील दुसरे सर्वांत मोठे शहर असलेल्या बार्सिलोना येथे गर्दीमध्ये...

10.33 AM

सोल : कोरिया द्विपकल्पात कोणत्याही प्रकारचे युद्ध होणार नाही, असे दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जी इन यांनी म्हटले आहे. उत्तर...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017