"एक पान उलटलं तर.."; IAS अधिकाऱ्याने लंडनमध्ये राहुल गांधींना सुनावलं

राहुल गांधींनी लंडनमधल्या एका कार्यक्रमात 'भारत हा राज्यांचा संघ आहे' असं विधान केलं होतं.
Rahul Gandhi
Rahul GandhiSakal

काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या लंडनच्या दौऱ्यावर आहेत. तिथल्या काही कार्यक्रमांना ते हजेरी लावत आहेत. या दरम्यान, त्यांच्या काही वक्तव्यांमुळे देशातलं वातावरण मात्र तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, केंब्रिज विद्यापीठातल्या त्यांच्या भाषणादरम्यान तिथल्या एका भारतीय अधिकाऱ्याने राहुल गांधींना राष्ट्रधर्मावरून सुनावलं आहे. याचा व्हिडीओही व्हायरल होत आहेत.

Rahul Gandhi
लडाखमध्ये युक्रेनसारखी परिस्थिती; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

लंडन दौऱ्यादरम्यान राहुल गांधी आयडियाज फॉर इंडिया या संमेलनात सहभागी झाले होते. यानंतर सोमवारी त्यांनी केंब्रिज विश्वविद्यालयात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमातही सहभागी झाले होते. या कार्यक्रमादरम्यान राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भारताबद्दलचं जे व्हिजन आणि ते सर्वसमावेशक नाही. त्यांच्या धोरणामध्ये देशातल्या मोठ्या लोकसंख्येचा विचारच केलेला नाही. हे चुकीचं असून भारताच्या विचारांच्या विरुद्ध आहे. तसंच भारत हा विविध राज्यांचा संघ आहे, असं विधानही त्यांनी केलं होतं. (Rahul Gandhi in Cambridge University London)

Rahul Gandhi
मोदींनी देशाचे रक्षण करावे; चीनबाबत राहुल गांधी यांची केंद्रावर टीका

या कार्यक्रमादरम्यानचा एक व्हिडीओ भारतीय प्रशासकीय सेवेतले अधिकारी सिद्धार्थ वर्मा यांनी शेअर केला आहे. या कार्यक्रमात बोलत असताना वर्मा यांनी राहुल गांधींना सडेतोड उत्तर दिलं आहे. वर्मा म्हणाले, तुम्ही संविधानातल्या ज्या अनुच्छेदाचा उल्लेख करून सांगितलं की भारत हा राज्यांचा संघ आहे. पण जर तुम्ही याच्याच मागचं पान उलटून पाहिलं असेल आणि त्यात प्रस्तावना वाचली असेल तर त्यात तुम्हाला हा उल्लेख वाचायला मिळेल की भारत एक राष्ट्र आहे. भारत जगातल्या सर्वात जुन्या संस्कृतींपैकी एक आहे. राष्ट्र शब्द वेदांमध्ये आहे. एवढंच नव्हे तर जेव्हा चाणक्याने तक्षशिलामधल्या विद्यार्थ्यांना शिकवलं, तेव्हा त्यांनीही हे स्पष्ट केलं होतं की विविध जनपदांमध्ये जरी विभागलं गेलं असलं तरी अंतिमतः एक राष्ट्र आहे, ज्याला भारत असं संबोधलं जातं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com