इधी फाउंडेशनचे अब्दुल सत्तार इधी यांचे निधन

वृत्तसंस्था
शनिवार, 9 जुलै 2016

कराची - पाकिस्तानमध्ये दानशूर म्हणून प्रसिद्ध असलेले अब्दुल सत्तार इधी (वय 92) यांचे शुक्रवारी रात्री प्रदीर्घ आजारपणाने निधन झाले.

इधी फाउंडेशनमार्फत पाकिस्तानमध्ये शेकडो रुग्णवाहिका, रुग्णालये आणि अनाथाश्रम चालविले जातात. इधी यांच्याबद्दल सर्व राजकीय पक्षांमध्येही मोठा आदर असून नागरिकांमध्येही ते लाडके होता. मानवतेसाठी आपले पूर्ण आयुष्य समर्पित करणारे इधी हे समाजसेवा आणि मानवतेसाठी काम करत होते. त्यामुळे त्यांची ओळख दानशूर अशी होती. 

इधी यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या विकारामुळे उपचार सुरु होते. त्यातच श्वसनाचा त्रास सुरु झाल्याने त्यांना सिंध इंस्टीट्यूट ऑफ यूरोलॉजी अँड ट्रांसप्लांटेशन मध्ये दाखल करण्यात आले होते. अखेर शुक्रवारी त्यांनी कराचीमध्ये अखेरचा श्वास घेतला. जवळपास 60 वर्षांपूर्वी वेलफेअर फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी सेवाकार्याला सुरुवात केली. त्यानंतर नर्सिंग होम, अनाथाश्रम, दवाखाने, वुमेन शेल्टर, पूनर्वसन केंद्र इत्यादींच्या माध्यमातून अब्दुल सत्तार इधींनी गरजू आणि गरीब जनतेची सेवा केली. अब्दुल सत्तार इधींचा जन्म भारतात झाला. मात्र, फाळणीनंतर ते पाकिस्तानमध्ये गेले. रॅमन मॅगेसेसे, लेनिन पीस प्राईज यांसह अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्काराने अब्दुल सत्तार इधी यांना सन्मानित करण्यात आले होते.