शरीफ यांना न्यायालयात खेचणार : इम्रान खान

पीटीआय
मंगळवार, 9 मे 2017

दहशतवादी कारवायांसाठी लादेनकडून पैसे घेतल्याचा आरोप

इस्लामाबाद: जम्मू आणि काश्‍मीर आणि अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी कारवायांना पाठबळ देण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी ओसामा बिन लादेनकडून पैसे घेतल्याचा आरोप तेहरिक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी आज केला. याप्रकरणी शरीफ यांना न्यायालयात खेचणार असल्याचेही खान यांनी स्पष्ट केले आहे.

शरीफ यांनी लष्कर ए तैयबाचा तत्कालीन प्रमुख ओसामा बिन लादेनकडून जिहादच्या नावाखालीही तब्बल दीड अब्ज रुपये स्वीकारले होते. त्याचा वापर त्यांनी 1989 मध्ये बेनझीर भुट्टो सरकारविरोधातही केला होता. लोकशाहीविरोधात कटकारस्थान रचणाऱ्या शरीफ यांच्यविरोधात सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते फवाद चौधरी यांनी दिली आहे.

कथित भ्रष्टाचारप्रकरणी शरीफ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही तेहरिक ए इन्साफने केली आहे. आयएसआयचे माजी गुप्तहेर खालिद ख्वाजा यांच्या पत्नीने लिहिलेल्या "खालिद ख्वाजा ः शहीद ए अमन' या पुस्तकातील संदर्भ घेत हे आरोप करण्यात आले असून, त्यामुळे पनामा प्रकरणात गुंतलेल्या नवाज शरीफ यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Imran Khan to take Sharif to court