शरीफ राजवटीचा शेवट लवकरच- इम्रान खान

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 जानेवारी 2017

डेरा गाझी खान (पाकिस्तान)- पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या राजवाटीचा शेवट जवळ आला आहे, अशी टीका "पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ' (पीटीआय) या पक्षाचे अध्यक्ष व माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांनी बुधवारी केली.

"पनामा पेपर्स लिक' प्रकरणात शरीफ यांचा भ्रष्ट कारभार उजेडात आला असून, या प्रकरणी अल्लाने स्वतःहून त्यांच्यावर नोटीस बजावली आहे, त्यांनी एका जाहीर व्याख्यानात बोलताना म्हटल्याचे वृत्त येथील एका दैनिकाने दिले आहे. इम्रान खान यांनी "पनामा'संदर्भात या वेळी उपस्थितांना माहिती दिली. या प्रकरणात शरीफ दोषी आहेत असे वाटते का, यावर मत नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले.

"पनामा पेपर्स' प्रकरणातून पंतप्रधानांचा भ्रष्टाचार उजेडात आला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात याची चौकशी होऊ नये, असा प्रयत्न शरीफ करीत असल्याचा आरोप खान यांनी केला. शरीफ यांनी 2006मध्ये "लंडनमधील मेफेअर अपार्टमेंट'ची खरेदी केली असल्याचे त्यांच्या वकिलांचे म्हणणे आहे, पण "बीबीसी'च्या वृत्तानुसार शरीफ यांनी ही मालमत्ता 1990मध्येच खरेदी केली असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे ते म्हणाले.

शरीफ यांच्या राजवटीला देश कंटाळला आहे, असे सांगताना इस्लाम धर्माच्या शिकवणीनुसार पाकिस्तानची रचना करण्याचा प्रयत्न (पीटीआय) करेल. "शरीफ माफिया'च्या तावडीतून देशाची लवकरच मुक्तता होईल, असा दावा खान यांनी केला.

ग्लोबल

डोकलामबाबतही पूर्वीची भूमिका कायम बीजिंग: लडाखमध्ये पेगॉंग सरोवराच्या काठावरून "पीपल्स लिबरेशन आर्मी'ने भारतीय हद्दीमध्ये...

बुधवार, 16 ऑगस्ट 2017

बीजिंग - लडाखमध्ये पेगॉंग सरोवराच्या काठावरून "पीपल्स लिबरेशन आर्मी'ने भारतीय...

बुधवार, 16 ऑगस्ट 2017

इस्लामाबाद : कुलभूषण जाधव प्रकरणासाठी पाकिस्तानचे माजी ऍटर्नी जनरल यांची तर्दथ न्यायाधीश (ऍड-हॉक जज) नियुक्ती होण्याची शक्‍यता...

मंगळवार, 15 ऑगस्ट 2017