World Book Day: शेक्सपिअरच्या जन्म अन् मृत्यूमध्ये एका गोष्टीचे साम्य; जाणून घ्या

शेक्सपिअरला आदरांजली म्हणून १९९५ साली २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन (World Book Day) म्हणून घोषित केला
World Book Day
World Book DayGoogle

World Book Day: आज २३ एप्रिल...आजचा दिवस जागतिक पुस्तक दिवस म्हणून साजरा केला जातो. कारण या दिवशी महान लेखक ,जगप्रसिद्ध नाटककार शेक्सपिअर यांच्या जन्म झाला अन योगायोगाने त्यांचा मृत्यूही यांच दिवशी झाला. पुढे या लेखकाला आदरांजली वाहण्यासाठी म्हणून १९९५ साली २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून घोषित केला आणि तिथुन पुढे दरवर्षी २३ एप्रिल हा पुस्तक दिवस म्हणून साजरा होऊ लागला. (In honor of Shakespeare, April 23, 1995 was declared World Book Day.)

या पुस्तक दिवसाला आपण आपल्या घरातील पुस्तकांची काळजी कशी घ्यावी या विषयी माहिती घेऊ या..

  • जे केव्हा तुम्ही पुस्तके वाचण्यासाठी हातात घेता तेव्हा तुमचे हात स्वच्छ असावेत.

  • शक्यतो पुस्तक वाचातांना किंवा हाताळतांना खाण्यापिण्याचे पदार्थ दूर ठेवावेत.

  • वाचन कुठपर्यंत झालयं किंवा काही खुणेसाठी पुस्तकाचे पानं कोपर्‍यात दुमडण्याऐवजी बुकमार्क्सचा वापर करावा वापरावेत.

World Book Day
लस घेणारे 'फर्स्ट मॅन' विल्यम शेक्सपिअर यांचे निधन
  • शक्य असल्यास नविन पुस्तक घेतल्यावर प्लॅस्टीक अथवा कागदी कव्हर घालावं.

  • खोलीत तुमचं पुस्तकांचं कपाटं थेट सूर्याची किरणे पुस्तकांवर पडेल अशा ठिकाणी नसावं.

  • दोन तिन महिण्यातुन पुस्तके अधून मधून हाताळत रहावीत.पुस्तकाच्या कपाटाची वेळोवेळी साफसफाई करावी.

  • पुस्तकं शक्यतो उभी लावावीत. एकाच उंचीची, आकाराची पुस्तक जवळजवळ लावावीत.

World Book Day
‘कथारूप शेक्सपिअर’चे लेखक प्रभाकर देशपांडे साखरेकर यांचे निधन
  • पुस्तकाच्या कपाट किंवा बुकशेल्फमध्ये तुमच्या सोईनुसार चंदनाची काडी, लवंग, डांबरगोळी यापैकी जे उपलब्ध असेल ते ठेवावी जेणेकरून पुस्तकांना वाळवी लागणार नाही.

  • पुस्तकावर खुणा करणे,चित्र रंगवणे,रेघा मारणे अशा गोष्टी टाळाव्यात.

  • आपण आपल्या पुस्तकावर रेखीव अक्षरात नाव व तारीख टाकावी.आणि सगळ्यात महत्त्वाचे दुसर्‍या व्यक्तीस पुस्तक वाचायला दिल्यानंतर तशी नोंदकरुन आपल्या डायरीत करुन ठेवावी.

  • चुकुन कधी पुस्तकवर पाणी वा इतर काही सांडून ओले झाल्यास पंख्याखाली वाळवावे अन नंतरच्या मध्यम इस्री त्यावरून काळजीपूर्वक फिरवावी. आम्ही औरंगाबादचे पुस्तक विक्रेते ज्ञानेश्वर वाघ यांना जेव्हा विचारलं की तुम्ही तुमच्या जवळच्या पुस्तकाची काळजी कशी घेता तेव्हा ते सांगतात आम्ही बहुतेक करुन पुस्तके मोठ्या खोक्यात ठेवतो आणि पुस्तकावर धुळ बसणार,पाण्याचे थेंब पुस्तकात पडणार नाही याची विशेष करुन काळजी घेतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com