भारताने सैन्य नाही हटवलं तर युद्ध होईल- चीनची पुन्हा धमकी

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

सुरक्षा संस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खरी माहिती देत नाहीत. त्या मोदींना अंधारात ठेवत आहेत.

बीजिंग : चीनने पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. भारताने डोकलाम येथून आपलं सैन्य नाही हटवलं तर युद्ध होईल. एवढंच नव्हे तर चीनने हा शेवटचा इशारा म्हटलं आहे. 

चीनचे सरकारी वृत्तपत्र 'ग्लोबल टाइम्स'च्या संपादकाने व्हिडिओ संदेशाद्वारे हा इशारा प्रसारित केला आहे. त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, नवी दिल्ली सर्वांत वाईट दिवसांची तयारी करत आहे. सुरक्षा संस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खरी माहिती देत नाहीत. त्या मोदींना अंधारात ठेवत आहेत.

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1962 मध्ये जी चूक केली होती तीच चूक भारत आज पुन्हा करत आहे, असे या व्हिडिओमध्ये ग्लोबल टाइम्सचे संपादक हू जिजिन यांनी 1962 च्या युद्धाचा संदर्भ देऊन म्हटले आहे. चीनने प्रथमच पंतप्रधान मोदी यांचे नाव घेऊन युद्धाची धमकी दिली आहे. सुरक्षा संस्था आपल्या क्षमतांबद्दल मोदी यांना अंधारात ठेवत आहेत असे त्यांनी म्हटले आहे. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :