भारत करु शकतो, आपण का नाही? - ट्रम्प

वृत्तसंस्था
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016

ट्रम्प यांनी अध्यक्ष बराक ओबामा यांना लक्ष्य करत अमेरिकेच्या आर्थिक विकास दर कमी असल्यामुळे त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. अमेरिकेचा विकास दर तिसऱ्या तिमाहीमध्ये 2.9 टक्के राहिला आहे. 

वॉशिंग्टन - भारतासारखा मोठा देश 8 टक्के विकास दर घेऊन प्रगती करु शकतो, तर मग अमेरिका का करु शकत नाही, असा प्रश्न अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी उपस्थित केला आहे.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांनी प्रचारात सतत भारताचा उल्लेख केला आहे. आता त्यांनी विकास दरावरून पुन्हा एकदा भारताचे उदाहरण दिले आहे. ट्रम्प यांनी अध्यक्ष बराक ओबामा यांना लक्ष्य करत अमेरिकेच्या आर्थिक विकास दर कमी असल्यामुळे त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. अमेरिकेचा विकास दर तिसऱ्या तिमाहीमध्ये 2.9 टक्के राहिला आहे. 

ट्रम्प म्हणाले, की बराक ओबामा यांच्यामुळे आर्थिक विकासाची गती मंदावली आहे. ओबामा पहिले अध्यक्ष आहेत ज्यांच्या कार्यकाळात देशाचा आर्थिक विकासदर 3 टक्क्यांहून अधिक झालाच नाही. मोठा देश असल्याने जलदगतीने विकास करु शकत नाही असे मला सांगण्यात आले आहे. पण भारतही मोठा देश असून, 8 टक्के विकास दर घेऊन वाटचाल करत आहे. मग, आपण का करु शकत नाही. चीनचा विकास दरदेखील 6 ते 8 टक्के दरम्यानच आहे.

Web Title: India growing at 8 per cent, why US is not: Donald Trump