भारत अफगाणिस्तानचा सर्वांत विश्‍वासु मित्र: अमेरिका

वृत्तसंस्था
बुधवार, 21 जून 2017

अफगाणिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांना व इतर मनुष्यबळास भारताकडून मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित करण्यात येत आहे. दरवर्षी भारतामधील विविध लष्करी संस्थांमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी सुमारे 130 अफगाण भारतामध्ये जात असतात. भारत हा अफगाणिस्तानचा सर्वांत विश्‍वासु प्रादेशिक मित्रदेश आहे

वॉशिंग्टन - भारत हा अफगाणिस्तानचा सर्वांत विश्‍वासु मित्रदेश असल्याची भावना अमेरिकेने अफगाणिस्तानसंदर्भातील एका अहवालामध्ये व्यक्त केली आहे. ट्रम्प प्रशासनाने अफगाणिस्तानसंदर्भात तयार केलेला हा पहिलाच अहवाल असून यामध्ये भारताची मुक्त कंठाने प्रशंसा केली आहे.

"अफगाणिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांना व इतर मनुष्यबळास भारताकडून मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित करण्यात येत आहे. दरवर्षी भारतामधील विविध लष्करी संस्थांमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी सुमारे 130 अफगाण भारतामध्ये जात असतात. भारत हा अफगाणिस्तानचा सर्वांत विश्‍वासु प्रादेशिक मित्रदेश आहे. अफगाणिस्तानच्या विकास कार्यक्रमामध्येही भारताचे योगदान सर्वांत मोठे आहे,'' असे पेंटॅगॉनने म्हटले आहे. पेंटॅगॉनच्या या अहवालामध्ये डिसेंबर 2016 ते मे 2017 या कार्यकाळाचा अभ्यास करण्यात आला आहे.

भारताने अफगाणिस्तानला मर्यादित सुरक्षा सहाय्यही केले असून यांमध्ये भारताकडून अफगाणिस्तानला देण्यात आलेली चार मिग-35 विमाने सर्वांत उल्लेखनीय आहेत. एप्रिल 2016 ते मार्च 2017 या काळात भारताकडून अफगाणिस्तानला 221 कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे.

पाकिस्तान व एकंदरच मध्य व पश्‍चिम आशियासंदर्भातील भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये अफगाणिस्तानचे स्थान अत्यंत संवेदनशील असल्याचे मानले जाते.

ग्लोबल

नोकऱ्यांबाबत काँग्रेस ठरलेले अपयशी, मोदी तर निष्क्रिय: राहुल गांधी न्यूयॉर्क : असहिष्णुता आणि बेरोजगारी ही सध्या भारताच्या...

11.27 AM

मेक्सिको सिटी : मेक्सिकोच्या मध्यवर्ती भागात झालेल्या मोठ्या भूकंपाने संपूर्ण देश हादरला असून, यामध्ये सुमारे दीडशे लोक...

10.33 AM

न्यूयॉर्क : किम जोंग उन यांनी आपली चिथावणीखोर कृत्ये सुरूच ठेवली, तर उत्तर कोरियाला पूर्णपणे उद्‌ध्वस्त केले जाईल, असा गंभीर...

10.03 AM