"एनएसजी'साठी अटीतटीची लढाई

पीटीआय
बुधवार, 22 जून 2016

नवी दिल्ली - अणू पुरवठादार गटात (एनएसजी) भारताच्या सहभागासाठी प्रयत्न करण्यासाठी परराष्ट्र सचिव दक्षिण कोरियाची राजधानी सोल येथे जाण्याची शक्‍यता आहे. तसेच ताश्‍कंदमध्ये होणाऱ्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेनशनच्या (एससीओ) परिषदेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेण्याची दाट शक्‍यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

"एनएसजी‘ सदस्यांची दोन दिवसीय बैठक सोल येथे 23 जूनला सुरू होणार आहे. या गटातील सदस्यत्वासाठी भारताचे जोरदार प्रयत्न सुरू असून, यासाठी चीनचाच प्रामुख्याने अडथळा आहे. जयशंकर यांनी गेल्याच आठवड्यात गुप्तपणे चीन दौराही केला होता. मात्र अद्यापही चीनचा अप्रत्यक्ष विरोध आहे. त्यामुळे जयशंकर हे बैठकीच्या काळात थेट सोलला जाऊनच भारताच्या सदस्यत्वासाठी प्रयत्न करणार असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. या बैठकीकडे जयशंकर यांचे वैयक्तिकरीत्या लक्ष आहे. बैठकीत होणाऱ्या चर्चेचा अंदाज घेऊन ते भारताचा मुद्दा पुढे सरकविण्यासाठी सोलला जाण्याचा निर्णय घेऊ शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

या बैठकीचा मुख्य भाग 24 जूनला होणार आहे. याच दिवशी "एससीओ‘ परिषदेसाठी पंतप्रधान मोदी ताश्‍कंदला जात आहेत. या परिषदेला चीनचे अध्यक्ष शी जिनपिंगही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मोदीसुद्धा जिनपिंग यांची भेट घेऊन त्यांची समजूत घालतील, अशी चिन्हे आहेत.

ग्लोबल

अमेरिकेने खडसावल्यानंतर "ड्रॅगन'कडून जोरदार पाठराखण बीजिंग: दहशतवाद्यांना पाठिंबा दिल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प...

09.33 PM

वॉशिंग्टन : पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी स्वर्ग बनला आहे. अमेरिका आता यावर गप्प बसू शकत नाही, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष...

10.39 AM

अमेरिकेतील मेरिलॅंड विद्यापीठाच्या अहवालातील नोंद; गेल्या वर्षी सर्वाधिक दहशतवादी हल्ले वॉशिंग्टन: "इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017