भारतातील "फेसबुक युजर्स'ची संख्या जगातील सर्वोच्च...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 जुलै 2017

गेल्या सहा महिन्यांत अमेरिकन फेसबुक युजर्सची संख्या ही 12 टक्‍क्‍यांनी वाढली; तर याच काळात भारतीय युजर्सची संख्या तब्बल 27 टक्‍क्‍यांनी वाढली

कॅलिफोर्निया - फेसबुक वापरणाऱ्या भारतीय युजर्सची संख्या ही आता तब्बल 24.1 कोटी इतकी झाल्याची माहिती फेसबुककडून देण्यात आली असून, ही संख्या कोणत्याही इतर देशामधील युजर्सच्या संख्येपेक्षा जास्त असल्याचेही निष्पन्न झाले आहे. अमेरिकेमध्ये फेसबुक वापरणाऱ्या युजर्सची संख्या 24 कोटी इतकी आहे. जगातील फेसबुक युजर्सची एकूण संख्या 2 अब्ज इतकी झाली आहे.

भारतामधील फेसबुक युजर्सची संख्या वाढण्याचा वेग अमेरिकेतील फेसबुक युजर्सची संख्या वाढण्याच्या दुपटीहूनही अधिक असल्याचेही आढळून आले आहे. गेल्या सहा महिन्यांत अमेरिकन फेसबुक युजर्सची संख्या ही 12 टक्‍क्‍यांनी वाढली; तर याच काळात भारतीय युजर्सची संख्या तब्बल 27 टक्‍क्‍यांनी वाढली. भारतामध्ये फेसबुक वापरणाऱ्या एकूण युजर्सपैकी तब्बल दोन तृतीयांश युजर्स हे पुरुष असल्याचेही निष्पन्न झाले आहे; तर अमेरिकेमधील एकूण फेसबुक युजर्सपैकी 54% या महिला आहेत. भारतामध्ये फेसबुक वापरणाऱ्या एकूण युजर्सपैकी 50 टक्‍क्‍यांहूनही जास्त जणांचे वय हे 25 पेक्षा कमी आहे.

फेसबुक वापरणाऱ्या भारतीय युजर्सची संख्या लक्षणीयरित्या वाढली असली; तरी देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ 19% लोकसंख्या फेसबुक वापरत असल्याचेही गेल्या जूनमध्ये सिद्ध झाले होते.

ग्लोबल

"युनिसेफ'च्या अहवालातील निष्कर्ष; शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे राष्ट्रांना आवाहन संयुक्त राष्ट्र संघ: जगात कोणत्याही ठिकाणी...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

इस्लामाबाद: पाकिस्तानचे हकालपट्टी केलेले पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या मुलांना पुढील आठवड्यात सुनावणीला हजर राहण्यासाठी...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

स्टॅनिस्लाव्ह पेट्रोव या नावाचा आणि आपला थेट काही संबंध नाही. पण, कदाचित या पृथ्वीवर आपण अस्तित्वात आहोत, यामागे स्टॅनिस्लाव्ह...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017