'शांतता टिकविण्यात भारताची मोठी भूमिका'

पीटीआय
सोमवार, 5 जून 2017

सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारताला महत्त्वाचा संरक्षण भागीदार म्हणून मान्यता देणे हा त्याचाच एक भाग आहे.

वॉशिंग्टन : भारताला अमेरिकेचा महत्त्वाचा संरक्षण भागीदार म्हणून मान्यता देण्यात या देशाने हिंदी महासागर प्रदेशात शांतता टिकविण्यात बजावलेल्या भूमिकेचा फार मोठा वाटा आहे, असे अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनी आज सांगितले. शांग्री-ला चर्चेदरम्यान बोलताना मॅटिस यांनी हे मत व्यक्त केले.

"दक्षिण आशियात दहशतवाद वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर सागरी सुरक्षा आणि इतर नव्या आव्हानांचा सामना करण्याचे उपाय अमेरिका शोधत आहे. सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारताला महत्त्वाचा संरक्षण भागीदार म्हणून मान्यता देणे हा त्याचाच एक भाग आहे.

हिंद महासागर भागात शांतता टिकविण्यासाठी भारताने अजोड भूमिका निभावली असल्याने त्यांना हा दर्जा देताना आम्हाला आनंद वाटला,' असे मॅटिस म्हणाले.