भारत-रशियादरम्यान संयुक्त सराव

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

. "इंद्र- 2017' या नावाने होणारा हा सराव उद्यापासून (ता. 20) सुरु होत आहे. आतापर्यंत या सरावात आलटून पालटून केवळ एकच सेनादल समाविष्ट होत असे. यंदा प्रथमच तिन्ही सेनादले एकाच वेळी सहभाग घेत आहेत

नवी दिल्ली, ता. 19 (यूएनआय) : भारत आणि रशियादरम्यान तिन्ही सेनादलांच्या संयुक्त सरावामध्ये भाग घेण्यासाठी स्वदेशी बनावटीच्या आयएनएस सातपुडा आणि आयएनएस कडमट या युद्धनौका रशियामध्ये पोचल्या आहेत.

काल (ता. 18) भारतीय लष्कर आणि हवाई दलाचे जवान येथे दाखल झाले. "इंद्र- 2017' या नावाने होणारा हा सराव उद्यापासून (ता. 20) सुरु होत आहे. आतापर्यंत या सरावात आलटून पालटून केवळ एकच सेनादल समाविष्ट होत असे. यंदा प्रथमच तिन्ही सेनादले एकाच वेळी सहभाग घेत आहेत.