भारत-अमेरिका भागीदारी अत्यंत यशस्वी : लेव्हॉय 

पीटीआय
सोमवार, 9 जानेवारी 2017

भारताबरोबरच्या भागीदारीमुळे अनेक दहशतवादी कट उधळले गेले. दोघांमधील सहकार्यामुळे अनेक अमेरिकी आणि भारतीय नागरिकांचे प्राण वाचले आहेत. ही भागीदारी आता अधिक दृढ झाली असून विविध पातळ्यांवर दहशतवादाविरोधातील मोहिमांबाबत दोघांमध्ये चर्चा सुरू आहे

वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या आठ वर्षांच्या कादकिर्दीत भारत आणि अमेरिकेमधील भागीदार अत्यंत यशस्वी ठरल्याचे येथील सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. तसेच, या काळात दोन्ही देशांनी मिळून अनेक दहशतवादी हल्ले उधळून लावल्याचा दावाही या अधिकाऱ्याने केला आहे.

ओबामा प्रशासनातील दक्षिण आशिया विभागाचे संचालक पीटर लेव्हॉय यांनी एका सुरक्षा विषयक परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले,""भारताबरोबरच्या भागीदारीमुळे अनेक दहशतवादी कट उधळले गेले. दोघांमधील सहकार्यामुळे अनेक अमेरिकी आणि भारतीय नागरिकांचे प्राण वाचले आहेत. ही भागीदारी आता अधिक दृढ झाली असून विविध पातळ्यांवर दहशतवादाविरोधातील मोहिमांबाबत दोघांमध्ये चर्चा सुरू आहे. दहशतवादाविरोधात भारताबरोबर भागीदारी करण्याचा निर्णय अमेरिकेसाठी अत्यंत यशस्वी ठरला आहे.'' मात्र, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये योग्य सहकार्य मिळत नसल्याने दहशतवाद्यांविरोधातील मोहिमेला फारसे यश मिळत नसल्याबद्दल लेव्हॉय यांनी नाराजीही व्यक्त केली. भारताला लवरकच अणू पुरवठादार गटाचे सदस्यत्व मिळण्याची आशा असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्लोबल

वॉशिंग्टन : पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी स्वर्ग बनला आहे. अमेरिका आता यावर गप्प बसू शकत नाही, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष...

10.39 AM

अमेरिकेतील मेरिलॅंड विद्यापीठाच्या अहवालातील नोंद; गेल्या वर्षी सर्वाधिक दहशतवादी हल्ले वॉशिंग्टन: "इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017

कॅलिफॉर्निया: सोशल नेटवर्किंगचा बादशाह असलेला फेसबुकचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग याच्या घरी पुन्हा...

रविवार, 20 ऑगस्ट 2017