पाकिस्तानमध्ये भारतीय नागरिकाला अटक

वृत्तसंस्था
रविवार, 21 मे 2017

इस्लामाबादमध्ये अटक करण्यात आलेल्या या भारतीय नागरिकावर परदेशी कायदा उल्लंघनांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इस्लामाबाद - कागदपत्रे अपूर्ण असल्याच्या कारणावरून पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांकडून इस्लामाबाद येथे भारतीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव पाकिस्तानमध्ये हेरगिरी आरोपावरून अटकेत आहेत. त्यांनी फाशीची शिक्षा सुनाविण्यात आली होती, पण आंतरराष्ट्रीय न्यायालयाने त्यांच्या फाशीवर स्थगिती आणली आहे. आता आणखी एका भारतीय नागरिकाला अटक करण्यात आली आहे.

पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्लामाबादमध्ये अटक करण्यात आलेल्या या भारतीय नागरिकावर परदेशी कायदा उल्लंघनांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भारतीय व्यक्तीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. या व्यक्तीची चौकशी करण्यात येत आहे.