इंडोनेशियाला भूकंपाचा धक्का; 52 मृत्युमखी

वृत्तसंस्था
बुधवार, 7 डिसेंबर 2016

मेवैरेऊदू- इंडोनेशियामधील एसे प्रांताला आज (बुधवार) बसेलल्या भूकंपाच्या धक्क्यात 52 नागरिकांचा मृत्यू झाला असून शंभरहून अधिकजण जखमी झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली.

पिदी जया जिल्ह्यातील गावांना 6.5 रिष्टर स्केल एवढ्या क्षमतेचा भूकंपाचा धक्का आज बसला. भूकंपानंतर अनेकांनी मोकळ्या जागेत धाव घेतली. भूकंपात विविध इमारतींची पडझड झाली असून अनेकजण गाडले गेले आहेत. विविध इमारतींच्या ढिगाऱयाखालून 52 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहेत. जखमींपैकी 73 जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, घटनास्थळी बचाव दलाचे पथक व रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. भूकंपामध्ये शंभरहून अधिक घरे, मशिदी, दुकाने पडली आहेत. शिवाय, रुग्णालये व शाळांनाचीही पडझड झाली आहे. त्सुनामीची कोणतीही शक्यता नाही, अशी माहिती राष्ट्रीय आपत्कालीन विभागाचे प्रवक्ते सुतोपो पुरवो नुग्रोहो यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

ग्लोबल

डोकलामबाबतही पूर्वीची भूमिका कायम बीजिंग: लडाखमध्ये पेगॉंग सरोवराच्या काठावरून "पीपल्स लिबरेशन आर्मी'ने भारतीय हद्दीमध्ये...

बुधवार, 16 ऑगस्ट 2017

बीजिंग - लडाखमध्ये पेगॉंग सरोवराच्या काठावरून "पीपल्स लिबरेशन आर्मी'ने भारतीय...

बुधवार, 16 ऑगस्ट 2017

इस्लामाबाद : कुलभूषण जाधव प्रकरणासाठी पाकिस्तानचे माजी ऍटर्नी जनरल यांची तर्दथ न्यायाधीश (ऍड-हॉक जज) नियुक्ती होण्याची शक्‍यता...

मंगळवार, 15 ऑगस्ट 2017