काश्‍मीर प्रश्नावर चर्चेतून तोडगा काढावा

वृत्तसंस्था
शनिवार, 15 जुलै 2017

न्यूयॉर्क - काश्‍मीर समस्येवर भारत-पाकिस्तानने चर्चा करून तोडगा काढावा, असा पुनरुच्चार संयुक्त राष्ट्रसंघाचे (यूएन) सरचिटणीस ऍन्टोनियो गुटेरेस यांनी आज केला. उभय देशांनी हा प्रश्न शांततेच्या मार्गाने हाताळण्याची गरज ही गुटेरेस यांनी व्यक्त केल्याची माहिती त्यांच्या प्रवक्‍त्याने दिली आहे.

काश्‍मीर समस्येकडे सरचिटणीसांचे पुरेसे लक्ष आहे का, की आपण त्यांचे लक्ष या मुद्द्याकडे वेधण्यासाठी कोणती मोठी घटना घडण्याची वाट पाहत आहोत. या प्रश्नावर बोलताना गुटेरेस यांचे प्रवक्ते स्टिफन म्हणाले, "आम्ही दोन्ही देशांना ही समस्या चर्चेतून सोडविण्याचे आव्हान केले आहे, आणि जेथे सरचिटणीसांचे लक्ष वेधण्याचा प्रश्न आहे; तेथे त्यांनी स्वतः पत्रकार परिषदेत याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती.'

गुटेरेस यांनी जूनमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत "काश्‍मीर वाद सोडविण्यासाठी तुम्ही दोन देशांत संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहात का,' अशी विचारणा त्यांना करण्यात आली होती. त्यावर गुटेरेस यांनी आपण याअनुषंगाने पाकिस्तानच्या पंतप्रधान नवाज शरीफ यांची तीनदा तसेच, भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोनदा भेट घेतल्याचे स्पष्ट केले होते, असेही स्टिफन यांनी निदर्शनास आणून दिले.

ग्लोबल

नॅपिडॉ : लष्कराबाबत सौम्य धोरण अवलंबिले असल्याचा आरोप म्यानमारच्या स्टेट कौन्सिलर आंग सान स्यू की यांनी फेटाळून लावला....

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

नोकऱ्यांबाबत काँग्रेस ठरलेले अपयशी, मोदी तर निष्क्रिय: राहुल गांधी न्यूयॉर्क : असहिष्णुता आणि बेरोजगारी ही सध्या भारताच्या...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

मेक्सिको सिटी : मेक्सिकोच्या मध्यवर्ती भागात झालेल्या मोठ्या भूकंपाने संपूर्ण देश हादरला असून, यामध्ये सुमारे दीडशे लोक...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017