इराकी सैन्याने मोसूल जिंकले

वृत्तसंस्था
सोमवार, 10 जुलै 2017

मोसूल - गेल्या तीन वर्षांपासून जिहादींच्या कब्जात असलेल्या मोसूलवर ताबा मिळविण्यासाठी सलग आठ माहिने चाललेल्या लढाईत इराकी सैन्याने विजय मिळविला आहे. आज इराकचे पंतप्रधान हैदर अल अब्दी यांनी येथे येऊन या विजयाबद्दल इराकी सैन्याचे अभिनंदन केले.

प्रदीर्घ चाललेल्या या लढाईत मोसूलचे खंडर झाले असून, हजारो निरपराधांना आपला प्राण गमवावा लागला आहे, तर जवळपास दहा लाख नागरिक विस्थापित झाले आहेत. पंतप्रधान आणि सैन्याचे प्रमुख हैदर अल अब्दी यांनी आज स्वतंत्र झालेल्या मोसूलमध्ये येऊन या ऐतिहासिक विजयाबद्दल सैन्याचे अभिनंदन केले, असे अधिकृत वृत्तात म्हटले आहे. इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांचे मृतदेह जुन्या शहरातील रस्त्यांवर पडले होते. जेथे अमेरिकेच्या नेतृत्वाखालील इराकी सैन्याने निर्णायक लढाईत विजय मिळविला आहे.

इराकी सैन्याने मोसूलमध्ये मृत्यूशीच लढाई केली होती. इराकी सैन्याचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल याहा रसूल यांनी राज्याच्या दूरचित्रवाणीवर बोलताना सांगितले, की तिग्रीस नदीतून पोहत पळून जाण्याच्या प्रयत्नात 30 दहशतवादी मारले गेले.