बगदादमधील स्फोटांत 35 जण मृत्युमुखी

पीटीआय
गुरुवार, 1 जून 2017

बगदाद : इराकची राजधानी बगदादमध्ये झालेल्या तीन आत्मघाती बॉंबस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 53 वर पोहचली आहे, तर शंभरपेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी दोन कार बॉंबचे स्फोट झाल्यानंतर संध्याकाळी पुन्हा एका आत्मघाती दहशतवाद्याने स्वतःला उडवून देत बॉंबस्फोट घडवून आणला.

पहिल्या स्फोटात 13 जण मृत्युमुखी पडले होते, तर दुसऱ्या कार बॉंबस्फोटात 10 जण मृत्युमुखी पडले होते. संध्याकाळी झालेल्या तिसऱ्या बॉंबस्फोटात 12 जण मृत्युमुखी पडल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली.

लष्कराच्या तपासणी नाक्‍याजवळ एका आत्मघाती दहशतवाद्याने स्वतःला उडवून दिले होते. इसिसने या बॉंबस्फोटांची जबाबदारी स्वीकारली आहे. रमजानचा महिना सुरू असताना बगदादमधील शिया मुस्लिमांना इसिसकडून लक्ष्य केले जात आहे.