इराकमधील आणखी एक शहर इसिसच्या जाचातून मुक्त

वृत्तसंस्था
रविवार, 27 ऑगस्ट 2017

या शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये इराकचे सैन्य घुसले असून शहरामधील ऐतिहासिक किल्लाही जिंकण्यात इराकी सैन्यास यश आले आहे. पश्‍चिम आशियातील ओटोमान तुर्क साम्राज्य काळात बांधण्यात आलेला हा किल्ला आहे

ताल अफार - इराकमधील एक महत्त्वपूर्ण शहर असलेल्या ताल अफारवर इराकी सैन्याने नियंत्रण मिळविल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे. इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेचे सैन्यास इराकी सैन्याने पराजित केले आहे.

या शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये इराकचे सैन्य घुसले असून शहरामधील ऐतिहासिक किल्लाही जिंकण्यात इराकी सैन्यास यश आले आहे. पश्‍चिम आशियातील ओटोमान तुर्क साम्राज्य काळात बांधण्यात आलेला हा किल्ला आहे. या किल्ल्यावर पुन्हा एकदा इराकचा झेंडा फडकाविण्यात आला आहे.

गेल्या जुलै महिन्यात मोसूल या इराकमधील शहरामध्ये इसिसविरोधात निर्णायक जय मिळविल्यानंतर आत्मविश्‍वास वाढलेल्या इराकी सैन्याने उर्वरित देशामध्येही आपली पकड अधिक मजबूत करण्याच्या उद्देशार्थ कारवाई सुरु केली आहे.