'आयएसआय'च्या प्रमुखांची बदली होण्याची शक्‍यता 

वृत्तसंस्था
शनिवार, 8 ऑक्टोबर 2016

पाकिस्तानचे सध्याचे लष्करप्रमुख जनरल राहील शरीफ यांचा कार्यकाळही संपुष्टात येत आहे. त्यांना मुदतवाढ मिळाली, तर रिझवान अख्तर यांची बदली होऊ शकते, असेही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे.

इस्लामाबाद: 'इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स' (आयएसआय) या पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणेच्या प्रमुखांची लवकरच बदली केली जाणार असल्याचे वृत्त स्थानिक प्रसिद्धीमाध्यमांनी दिले आहे. या बदलीचे कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. 

लेफ्टनंट जनरल रिझवान अख्तर हे सध्या 'आयएसआय'चे प्रमुख आहेत. या पदावर त्यांची नियुक्ती सप्टेंबर 2014 मध्ये झाली होती. तत्कालीन 'आयएसआय' प्रमुख लेफ्टनंट जनरल झहीर उल इस्लाम निवृत्त झाल्यानंतर नोव्हेंबर 2014 मध्ये अख्तर यांची पदभार स्वीकारला होता. सर्वसामान्यत:, पाकिस्तानमध्ये या यंत्रणेच्या प्रमुखांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो. मात्र, लष्करप्रमुखांच्या आदेशानुसार 'आयएसआय'च्या प्रमुखांची तडकाफडकी बदलीही केली जाऊ शकते. 

'द नेशन' या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, 'आयएसआय'मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय बदल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. रिझवान अख्तर यांची बदली हीदेखील त्यातीलच एक भाग असू शकेल, असे 'द नेशन'ने सूत्रांचा हवाला देऊन म्हटले आहे. अर्थात, पाकिस्तानचे सध्याचे लष्करप्रमुख जनरल राहील शरीफ यांचा कार्यकाळही संपुष्टात येत आहे. त्यांना मुदतवाढ मिळाली, तर रिझवान अख्तर यांची बदली होऊ शकते, असेही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. 

जनरल राहील शरीफ हे पुढील महिन्यात निवृत्त होणार आहेत. 'मला मुदतवाढ नको' असे त्यांनी जानेवारीतच जाहीर केले होते. मात्र, उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आक्रमक प्रत्युत्तर दिल्याने पाकिस्तानमध्ये अंतर्गत गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राहील शरीफ यांना मुदतवाढ मिळू शकते, अशीही चर्चा सुरू झाली आहे. 

ग्लोबल

वॉशिंग्टन: भारताकडून धोका निर्माण होत असल्याचा कांगावा करत पाकिस्तानकडून जाणीवपूर्वक दहशतवादाला खतपाणी घातले जात असून, ते तात्काळ...

07.27 AM

ऍमेझॉनच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी पाऊल सॅनफ्रान्सिस्को: गुगल आणि वालॅमार्ट यांनी ई-कॉमर्समध्ये भागीदारी केली असून,...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

जेद्दाह - सौदी अरेबियाची राजधानी असलेल्या जेद्दाह येथील रस्त्यावर एका लोकप्रिय...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017