पाकिस्तान: "आयएसआय' प्रमुखांची हकालपट्टी

वृत्तसंस्था
सोमवार, 12 डिसेंबर 2016

पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण व अंतर्गत राजकारणात अत्यंत संवेदनशील भूमिका बजावत असलेल्या आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल रिझवान अख्तर यांची झालेली हकालपट्टी हा सैन्यात महत्त्वपूर्ण बदल घडविण्याच्या नव्या लष्करप्रमुखांच्या प्रयत्नांमधील पहिला टप्पा मानला जात आहे...

इस्लामाबाद - पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाज्वा यांनी आयएसआय या देशातील अत्यंत प्रभावी गुप्तचर संथेच्या प्रमुखांची हकालपट्टी केली आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण व अंतर्गत राजकारणात अत्यंत संवेदनशील भूमिका बजावत असलेल्या आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल रिझवान अख्तर यांची झालेली हकालपट्टी हा सैन्यात महत्त्वपूर्ण बदल घडविण्याच्या नव्या लष्करप्रमुखांच्या प्रयत्नांमधील पहिला टप्पा मानला जात आहे.

उचलबांगडी झालेल्या अख्तर यांचे स्थान सांभाळण्यासाठी अद्यापी कोणाच्याही नावाची औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही. अख्तर यांना आता येथील राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. अख्तर यांच्यानंतर पाक सैन्यामधील अन्य एक महत्त्वपूर्ण अधिकारी असलेल्या लेफ्टनंट जनरल नवीद मुख्तार यांची नेमणूक आयएसआयच्या प्रमुखपदी करण्यात येईल, असा अंदाज पाकिस्तानमधील महत्त्वपूर्ण वर्तमानपत्र असलेल्या "डॉन'ने वर्तविला आहे.

मुख्तार यांना गुप्तचर खात्यामधील मोठा अनुभव आहे. याचबरोबर, आयएसआयच्या दहशतवादविरोधी विभागाचे प्रमुखपदही त्यांनी सांभाळले आहे.

ग्लोबल

ऍमेझॉनच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी पाऊल सॅनफ्रान्सिस्को: गुगल आणि वालॅमार्ट यांनी ई-कॉमर्समध्ये भागीदारी केली असून,...

09.03 PM

जेद्दाह - सौदी अरेबियाची राजधानी असलेल्या जेद्दाह येथील रस्त्यावर एका लोकप्रिय...

01.36 PM

लंडन : भारताचा मोस्ट वॉंटेड डॉन दाऊद इब्राहीमच्या मालमत्तांना ब्रिटिश सरकारने आर्थिक निर्बंधांच्या यादीमध्ये समाविष्ट केले आहे....

10.42 AM