ख्रिश्चन आमची आवडती शिकार- इसिस

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

इसिसने नुकताच प्रसिद्ध केलेला हा व्हिडिओ 20 मिनिटांचा असून, त्यामध्ये AK-47 बंदुक घेऊन एक अतिरेकी बोलताना दिसत आहे.

कैरो- 'ख्रिश्चन हे आमची आवडती शिकार आहे' असे दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट तथा 'इसिस'ने म्हटले आहे. यासंदर्भात इसिसच्या दहशतवाद्यांकडून एक नवा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

कैरोमधील एका चर्चमध्ये डिसेंबरमध्ये एका आत्मघातकी हल्लेखोराने बाँबस्फोट घडवून आणला होता. त्यामध्ये 30 लोक मृत्युमुखी पडले होते. 
इसिसने नुकताच प्रसिद्ध केलेला हा व्हिडिओ 20 मिनिटांचा असून, त्यामध्ये AK-47 बंदुक घेऊन एक अतिरेकी बोलताना दिसत आहे. तो म्हणतो, "प्रत्येक काफराला मारून टाकण्याची आज्ञा अल्लाहने दिली आहे."

इजिप्तमधील कॉप्टिक ख्रिश्चन पोप, ख्रिश्चन उद्योजक, न्यायाधीश, पाद्री जे अल्पसंख्यांकांना संरक्षण देण्याची मागणी करीत आहेत, किंवा इजिप्तमधील मुस्लिम बहुसंख्यांकांबद्दल अवमानकारक भाषा वापरतात अशा लोकांचे चित्रण या व्हिडिओमध्ये दाखविण्यात आले आहे. 
 

Web Title: ISIS Egypt affiliate: Christians are our 'favorite prey'