'इसिस' प्रवक्ता अदनानी ठार झाल्याचे स्पष्ट

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 सप्टेंबर 2016

वॉशिंग्टन - सीरियाच्या उत्तरेकडील भागात अमेरिकेच्या लष्करी कारवाईत ‘इसिस‘चा प्रवक्ता आणि दहशतवादी हल्ल्यांचा ‘मास्टर माइंड‘ अबू महंमद अल-अदनानी ठार झाल्याचे पेंटागॉनकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अमेरिकेच्या सैन्याने 30 ऑगस्टला केलेल्या हवाई हल्लांमध्ये अदनानी ठार झाल्याचे सांगण्यात आले आहे. रशियाच्या सैन्याने यापूर्वी 31 ऑगस्टलाच अदनानी आमच्या सैन्याच्या हल्ल्यात ठार झाल्याचे म्हटले होते. अल-अदनानी हा ‘इसिस‘चा सर्वांत ज्येष्ठ नेता होता. तो ठार झाल्यामुळे 'इसिस‘साठी हा मोठा फटका मानला जातो आहे. त्यामुळे अल-अदनानी याच्या मृत्यूचा बदला घेण्याची घोषणा "इसिस‘ने केली आहे. 

अमेरिकी लष्कराने अलेप्पो प्रांतातील अल-बाब शहराजवळ केलेल्या कारवाईत अल-अदनानीला ठार करण्यात आल्याची माहिती ‘पेन्टॅगॉन‘तर्फे देण्यात आली. "इसिस‘चा सर्वांत ज्येष्ठ म्होरक्‍या असलेल्या अल-अदनानी याला लक्ष्य करत अमेरिकी लष्करासह संयुक्त फौजांनी हल्ला केला. रशियाने अदनानीला ठार केल्याचा दावा हास्यास्पद असल्याचे पेन्टॅगॉनने केला आहे.