पाकिस्तानच्या तुरुंगात 457 भारतीय कैदी
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या विविध 457 भारतीय कैदी असून, त्यात 399 मच्छीमार आहेत. पाकिस्तानने आज यासंदर्भातील यादी भारतीय उच्चायुक्तांकडे सुपूर्त केली. मे 2008 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या कौन्सिलर ऍक्सेसच्या कराराच्या अंतर्गत पाकिस्तानने ही कैद्यांची यादी भारताकडे सुपूर्त केली आहे.

या कराराअंतर्गत दोन्ही देश वर्षातून दोनदा या याद्या एकमेकांना देत असतात. दरवर्षी एक जानेवारी आणि एक जुलै रोजी दोन्ही देश या याद्या एकमेकांकडे देत असतात. पाकिस्तानने आज 457 भारतीय कैद्यांची यादी भारताकडे सुपूर्त केली. त्यात 58 साधे नागरिक, तर 399 मच्छीमार आहेत, अशी माहिती इस्लामाबाद येथील भारतीय उच्चायुक्तांनी दिली. पाकिस्तान येत्या आठ जानेवारी रोजी 146 मच्छीमारांची सुटका करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. नवी दिल्लीतील पाकिस्तानातील उच्चायुक्तांकडे आज भारतानेही पाकिस्तानी कैद्यांची यादी सोपविली आहे.