भ्रष्टाचारविरोधी न्यायालयात शरीफ यांची प्रथमच हजेरी

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

इस्लामाबाद: "पनामा पेपर्स'प्रकरणी भ्रष्टाचारविरोधी विभागाच्या विशेष न्यायालयात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आज प्रथमच हजेरी लावली. तसेच, याप्रकरणी शरीफ यांच्याविरोधात दोन ऑक्‍टोबर रोजी आरोप निश्‍चित केले जातील, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

भ्रष्टाचारविरोधी विभागाच्या विशेष न्यायालयात आज सकाळी शरीफ यांनी हजेरी लावली. आपल्या आजारी पत्नीची भेट घेऊन शरीफ हे सोमवारी पाकिस्तानात परतले आहेत. "आपली पत्नी आजारी असून, तिला भेटण्यासाठी मला जावे लागेल,' असे शरीफ यांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने शरीफ यांना जाण्यास परवानगी दिली. अवघी दहा मिनिटे शरीफ हे न्यायालयात उपस्थित होते. शरीफ यांची दोन मुले, मुलगी आणि जावयाच्या विरोधात भ्रष्टाचारविरोधात विशेष न्यायालयाने आज नव्याने अटक वॉरंट काढले आहे.

आपण खटल्याला सामोरे जाण्यास तयार आहोत, हे दर्शविण्यासाठी केवळ औपचारिकता म्हणून शरीफ यांनी न्यायालयात हजेरी लावली, असे सांगण्यात आले. मागील आठवड्यात विशेष न्यायालयाने शरीफ यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना समन्स बजावले होते.