ट्रम्प, अफगाणिस्तानमधून आता बाहेर पडा: तालिबान

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 जानेवारी 2017

अफगाणिस्तानच्या भूमीवर जोपर्यंत परकीय सैन्य आहे; तोपर्यंत येथे शांतता टिकणे अवघड असल्याचा इशारा तालिबानचा प्रवक्ता झबिहुल्लाह मुजाहिद याने दिला आहे...

काबूल - अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना तालिबानने इशारा दिला आहे. आता अमेरिकेने अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्याची वेळ आली आहे, असे तालिबानने म्हटले आहे.

अफगाणिस्तानमधील "इस्लामिक अमिरात'ने ट्रम्प यांच्यासाठी लिहिलेले पत्र माध्यमांकडे सोपविण्यात आले आहे. अफगाणिस्तानच्या भूमीवर जोपर्यंत परकीय सैन्य आहे; तोपर्यंत येथे शांतता टिकणे अवघड असल्याचा इशारा तालिबानचा प्रवक्ता झबिहुल्लाह मुजाहिद याने दिला आहे.

9/11 चा कुप्रसिद्ध दहशतवादी हल्ला घडविण्यात आल्यानंतर अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेचा कुख्यात म्होरक्‍या ओसामा बिन लादेन याला "शासन' करण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला (2001) केला होता. यानंतर गेली 16 वर्षे अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानच्या भूमीवर आहे. तालिबान व अमेरिकेच्या नेतृत्वाखाली नाटो आघाडीमध्ये सतत संघर्ष होत आहे. 16 वर्षांच्या लढाईनंतर तालिबानचा पूर्ण बीमोड होऊ शकलेला नाही.

या पार्श्‍वभूमीवर, ट्रम्प यांनी आता अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमधून मागे घ्यावे, असा स्पष्ट इशारा तालिबानकडून देण्यात आला आहे.

ग्लोबल

टोकियो - डोकलाम येथील भारत-भूतान-चीन या ट्रायजंक्‍शनजवळ भारतीय लष्कर व चिनी सैन्य...

10.57 AM

बार्सिलोना - स्पेनमधील दुसरे सर्वांत मोठे शहर असलेल्या बार्सिलोना येथे गर्दीमध्ये...

10.33 AM

सोल : कोरिया द्विपकल्पात कोणत्याही प्रकारचे युद्ध होणार नाही, असे दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जी इन यांनी म्हटले आहे. उत्तर...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017