इटलीला भूकंपाचा जोरदार धक्का
रोम - मध्य इटलीला आज (बुधवार) पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपामुळे अनेक इमारतींची पडझड झाली असून, जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.
अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे बसलेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.2 इतकी मोजण्यात आली आहे. पेरुजिया प्रांतातील नॉर्सिया शहरापासून काही अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. रोमपासूनपासून हे ठिकाण फक्त 150 किमी अंतरावर आहे.

भूकंपाचा धक्का बसण्यास सुरवात झाल्यानंतर नागरिकांनी घराबाहेर पळ काढला. अनेक इमारतींची पडझड झाली असून, अद्याप कोठेही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. इटलीचे पंतप्रधान मॅटो रेँझी यांनी नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत.