इटलीत सार्वमतानंतर पंतप्रधानांचा राजीनामा

वृत्तसंस्था
सोमवार, 5 डिसेंबर 2016

इटलीमधील केंद्रीय सरकार अधिक सशक्‍त करण्याचा रेंझी यांचा प्रयत्न होता. मात्र यामुळे पंतप्रधानंच्या हाती अधिकाधिक सत्ता एकवटली जाईल, अशी टीका त्यांच्या विरोधकांनी केली होती.

रोम - इटलीचे पंतप्रधान मतेओ रेंझी यांच्या राज्यघटनेमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या योजनेस येथील जनतेने सार्वमताच्या माध्यमामधून धुडकावून लावल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आहे. यानंतर केलेल्या एका भावनिक भाषणानंतर रेंझी यांनी राजीनामा दिला. माझा सरकार चालविण्याचा अनुभव येथे संपला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्‍त केली.

या सार्वमतामध्ये 60% जनतेने रेंझी यांच्या योजनेस स्पष्ट नकार दर्शविला. या प्रस्तावासाठी देशभरात सुमारे 70% मतदान झाले. इटलीमधील केंद्रीय सरकार अधिक सशक्‍त करण्याचा रेंझी यांचा प्रयत्न होता. मात्र यामुळे पंतप्रधानंच्या हाती अधिकाधिक सत्ता एकवटली जाईल, अशी टीका त्यांच्या विरोधकांनी केली होती. रेंझी यांना त्यांच्या पक्षामधीलही काही नेत्यांनी विरोध केला होता.

रेंझी यांची घटलेली लोकप्रियता, देशातील रखडलेली अर्थव्यवस्था आणि आफ्रिकेमधून इटलीमध्ये येणारे हजारो स्थलांतरित हे मुद्दे या सार्वमतामध्ये कळीचे ठरले असल्याचे दिसून आले आहे. आता रेंझी यांची त्यांच्या मंत्रिमंडळाबरोबर अखेरची चर्चा झाल्यानंतर ते राष्ट्राध्यक्ष सेर्गिओ मतारेला यांच्याकडे औपचारिकरित्या राजीनामा सोपविणार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

रेंझी यांच्यानंतर सध्याचे अर्थमंत्री पीएर कार्लो पादोआन हे नवे पंतप्रधान होण्याची अटकळ बांधण्यात आली आहे.

ग्लोबल

कॅलिफॉर्निया: सोशल नेटवर्किंगचा बादशाह असलेला फेसबुकचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग याच्या घरी पुन्हा...

03.45 PM

क्षेपणास्त्र हल्ल्याला कठोर प्रत्युत्तर वॉशिंग्टन: कुठल्याही प्रकारच्या संभाव्य आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आमचे लष्कर सज्ज...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

टोकियो - डोकलाम येथील भारत-भूतान-चीन या ट्रायजंक्‍शनजवळ भारतीय लष्कर व चिनी सैन्य...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017