नोकऱ्या देण्यात काँग्रेसला अपयश; मोदी तर निष्क्रियच- राहुल गांधी

वृत्तसंस्था
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

चीन खूप वेगाने प्रगती करत आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. त्या दिशेने काम करणे गरजेचे आहे. भारत आणि चीनच्या विकासाचे मॉडेल फरक असून, चीनचा विकास कोणत्या कारणामुळे होत आहे हे शोधले पाहिजे. आपण चीनला प्रतिस्पर्धी मानले पाहिजे. पण, आपण ते सध्या करू शकत नाही. चीनची धोरणे स्पष्ट असून, आपल्यालाही असेच काम करणे गरजेचे आहे.

नोकऱ्यांबाबत काँग्रेस ठरलेले अपयशी, मोदी तर निष्क्रिय: राहुल गांधी
न्यूयॉर्क : असहिष्णुता आणि बेरोजगारी ही सध्या भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि विकासासाठी मोठे आव्हान म्हणून उभे आहे. युवकांना नोकऱ्या देण्यात काँग्रेस सरकार अपयशी ठरले होते. तर, आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार निष्क्रिय असल्याची टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.

राहुल गांधी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवारी सायंकाळी प्रिन्सटन विद्यापीठात बोलताना सरकारच्या धोरणावर टीकास्त्र सोडले. थिंक टँक सेंटर फॉर अमेरिकन प्रोग्रेस (सीएपी) यांच्यातर्फे आयोजित राउंडटेबल बैठकीत त्यांना दक्षिण आशियाई तज्ज्ञासोबत चर्चा केली. राहुल गांधी यांनी यापूर्वी बर्कले विद्यापीठात बोलताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केले होते. आता त्यांनी बेरोजगारी हा भारतासमोरील मोठा प्रश्न असल्याचे म्हटले आहे.

राहुल गांधी म्हणाले, ''काँग्रेस सरकार युवकांना नोकऱ्या देण्यात अपयशी ठरली होते. पण, सध्याचे मोदी सरकार पूर्णपणे निष्क्रिय ठरले आहे. यामुळे देशात धोकादायक परिस्थिती निर्माण होत आहे. भारतात असहिष्णुतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेपुढे आव्हान निर्माण झाले आहे. भारतात दररोज 30 हजार युवक रोजगारासाठी पुढे येतात. पण, त्यांच्यापैकी फक्त 450 जणांना नोकरी मिळते. सरकारी आणि खाजगी क्षेत्रांनी एकत्र येत नोकऱ्यांच्या अधिकाधिक संधी निर्माण करणे, हे सरकारपुढे आव्हान आहे. रोजगारनिर्मितीसाठी एका मोहिम राबविण्याची गरज आहे. सध्याचे सरकार शिक्षण आणि आरोग्यासाठी आवश्यक निधी देऊ शकलेले नाही.''

चीन खूप वेगाने प्रगती करत आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. त्या दिशेने काम करणे गरजेचे आहे. भारत आणि चीनच्या विकासाचे मॉडेल फरक असून, चीनचा विकास कोणत्या कारणामुळे होत आहे हे शोधले पाहिजे. आपण चीनला प्रतिस्पर्धी मानले पाहिजे. पण, आपण ते सध्या करू शकत नाही. चीनची धोरणे स्पष्ट असून, आपल्यालाही असेच काम करणे गरजेचे आहे. मेक इन इंडियाचा छोट्या आणि मध्यम स्वरुपाच्या उद्योगांना लाभ मिळेल असे वाटत होते. पण, याचा फायदा मोठ्या उद्योगपतींनाच होताना दिसत आहे. मी पक्षात पारदर्शकता आणण्याचे प्रयत्न केला आहे. पण, काही लोकांना ते आवडत नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

Web Title: Job creation India's biggest challenge: Rahul Gandhi at Princeton