सिनेटमध्ये प्रथमच भारतीय वंशाची अमेरिकन!

वृत्तसंस्था
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - कॅलिफोर्निया राज्याच्या ऍटर्नी जनरल कमला हॅरिस यांची सिनेट या अमेरिकेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये सभासद म्हणून निवड झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हॅरिस यांचा हा विजय ऐतिहासिक मानला जात आहे. सिनेटमध्ये निवड झालेल्या हॅरिस या पहिल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक आहेत.

51 वर्षीय हॅरिस यांनी डेमोक्रॅट पक्षाच्या अन्य सभासद लोरेटा सॅंचेझ यांचा 34.8 टक्के मतांनी पराभव केला. हॅरिस यांना एकूण 19,04,714 मते मिळाली. अमेरिकेचे मावळते अध्यक्ष बराक ओबामा व उपाध्यक्ष जो बिडेन यांनी हॅरिस यांना पाठिंबा दर्शविला होता. या पार्श्‍वभूमीवर, हॅरिस यांचा विजय हा जवळपास निश्‍चित मानला जात होता.

हॅरिस यांचा जन्म ओकलॅंड (कॅलिफोर्निया) येथे झाला असून त्यांची माता भारतीय तर पिता जमैकन-अमेरिकन वंशाचे आहेत. सिनेटसाठी निवड झालेल्या पहिल्या भारतीय उमेदवाराखेरीज हॅरिस या कॅलिफोर्नियामधून सिनेटसाठी निवडल्या गेलेल्या पहिल्या अमेरिकन कृष्णवर्णीय उमेदवारही ठरल्या आहेत. या दृष्टिकोनामधूनही त्यांचा हा विजय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

याआधी, अमेरिकन लोकशाही व्यवस्थेमधील कनिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमध्ये भारतीय वंशाच्या काही उमेदवारांची निवड झाली आहे. मात्र सिनेटमध्ये भारतीय वंशाच्या उमेदवाराची निवड होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.

ग्लोबल

कॅलिफॉर्निया: सोशल नेटवर्किंगचा बादशाह असलेला फेसबुकचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग याच्या घरी पुन्हा...

रविवार, 20 ऑगस्ट 2017

क्षेपणास्त्र हल्ल्याला कठोर प्रत्युत्तर वॉशिंग्टन: कुठल्याही प्रकारच्या संभाव्य आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आमचे लष्कर सज्ज...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

टोकियो - डोकलाम येथील भारत-भूतान-चीन या ट्रायजंक्‍शनजवळ भारतीय लष्कर व चिनी सैन्य...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017