कुलभूषण जाधव प्रकरण: खान यांची ऍड-हॉक जज म्हणून नियुक्ती? 

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

ऍटर्नी जनरलच्या कार्यालयाने ऍड-हॉक जज या पदासाठी ज्येष्ठ वकील मखदूम अली खान आणि जॉर्डनचे माजी पंतप्रधान अवन शवकत अल खासावनेह यांच्या नावाची शिफारस पंतप्रधान कार्यालयाला केली असल्याचे वृत्त "द एक्‍स्प्रेस ट्रिब्यून'ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. 

इस्लामाबाद : कुलभूषण जाधव प्रकरणासाठी पाकिस्तानचे माजी ऍटर्नी जनरल यांची तर्दथ न्यायाधीश (ऍड-हॉक जज) नियुक्ती होण्याची शक्‍यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. 

ऍटर्नी जनरलच्या कार्यालयाने ऍड-हॉक जज या पदासाठी ज्येष्ठ वकील मखदूम अली खान आणि जॉर्डनचे माजी पंतप्रधान अवन शवकत अल खासावनेह यांच्या नावाची शिफारस पंतप्रधान कार्यालयाला केली असल्याचे वृत्त "द एक्‍स्प्रेस ट्रिब्यून'ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. 

आंतरराष्ट्रीय मध्यस्थाचा अनुभव असलेल्या खान यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयांत आठ देशांचे प्रतिनिधीत्व केले आहे. खासावनेह यांनीही दशकभराहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय न्यायाधीश म्हणून काम केले आहे. 

जाधव यांना गेल्या वर्षी बलुचिस्तानमधून अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर भारताचे हेर असल्याचा आरोप ठेवण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. बलुचिस्तान आणि कराचीत दहशतवाद पसरवत असल्याचा आरोप ठेवत पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने जाधव यांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. भारताच्या मागणीनंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.