अमेरिकेप्रमाणेच कुवैतकडूनही "व्हिसाबंदी'ची घोषणा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

कुवैत - कुवैत या देशाने सीरिया, इराक, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराण या देशांमधून येणाऱ्या नागरिकांना व्हिसा नाकारण्याचा निर्णय घेतला आहे.

कुवैत - कुवैत या देशाने सीरिया, इराक, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराण या देशांमधून येणाऱ्या नागरिकांना व्हिसा नाकारण्याचा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच पश्‍चिम आशियातील काही मुस्लिमबहुल देशांमधील नागरिकांना अमेरिकेमध्ये प्रवेश नाकारण्याचा निर्णय घोषित केला आहे. या पार्श्‍वभूमीवर कुवैतकडूनही अशाच स्वरुपाच्या निर्णयाची करण्यात आलेली घोषणा अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. व्हिसाबंदी करण्यात आलेल्या देशांमधून इस्लामिक दहशतवादी घुसण्याचे भय कुवैतमधील नेतृत्वास आहे.

ट्रम्प यांनी इराक, इराण, सीरियासहित लीबिया, सोमालिया व सुदान या देशांमधील नागरिकांनाही व्हिसा न देण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या या धोरणानंतर अशाच स्वरुपाची पाऊले उचलणारा कुवैत हा एकमेव देश आहे. मात्र याआधी, कुवैतने 2011 मध्ये सर्व सीरियन नागरिकांना व्हिसा न देण्याचा निर्णय घेतला होता. पश्‍चिम आशियामधील सुन्नीकेंद्रित राजकारणाचे केंद्र झपाट्याने इराणकडे झुकत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर कुवैतकडून घेण्यात आलेला हा निर्णय अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे.