पंतप्रधान नरेंद्र मोदी पोर्तुगालमध्ये

वृत्तसंस्था
शनिवार, 24 जून 2017

लिस्बन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन देशांच्या पहिल्या टप्प्यातील परदेश दौऱ्याला आजपासून प्रारंभ झाला. मोदी यांचे आज पोर्तुगालमध्ये आगमन झाले असून, ते येथे पंतप्रधान अँतोनिओ कोस्ता यांच्यासोबत चर्चा करतील.

लिस्बन येथील विमानतळावर मोदींचे आगमन होताच पोर्तुगालच्या परराष्ट्रमंत्री ऑगस्तू सॅंतोस सिल्व्हा यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ते गोपाळ बागले यांनी सांगितले. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच पंतप्रधान मोदी अमेरिकेला भेट देत असून, त्यांच्या अमेरिका दौऱ्याबाबत तेथील माध्यमांमध्येही मोठी उत्सुकता दिसून येते. भारत ही जगातील सकारात्मक शक्ती असल्याची अमेरिकेला जाणीव असून त्यांच्याबरोबरील संबंध महत्त्वाचे असल्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना माहित असल्याचे "व्हाइट हाऊस'ने आज म्हटले आहे. भारताकडे अमेरिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे वृत्त चुकीचे असून, भारताचे महत्त्व ट्रम्प जाणून आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले.