लंडन महाराष्ट्र मंडळाचे 2 जूनपासून संमेलन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

मुंबई: महाराष्ट्र मंडळच्या (लंडन) वर्धापन दिनानिमित्त "लंडन मराठी संमेलन' हा उद्योजकता आणि सांस्कृतिक सोहळा 2 ते 4 जून दरम्यान लंडनमध्ये होणार आहे.

जागतिक महाराष्ट्रीय उद्योजक परिषद आणि फिनेक्‍ट - 2017 मुंबई-लंडन आर्थिक सेतू या दोन उपक्रमांचे उद्‌घाटन 2 जूनला कॅनरी व्हार्फ हू या लंडनच्या आर्थिक केंद्रातील कॅनडा स्क्वेअरमध्ये होणार आहे. या वेळी सर चिंतामणराव देशमुखांच्या आठवणींना उजाळा देण्यात येणार आहे. या संमेलनात प्रथितयश मराठी उद्योजकांचा सन्मान करण्यात येणार आहे. अर्थशास्त्र, माहिती व तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीतील तज्ज्ञ संमेलनात मार्गदर्शन करतील.

नोंदणीसाठी https://www.lms2017.org.uk/lms-business-summit/ येथे संपर्क साधावा.