लंडनमधील बाजारपेठचा भाग आगीत भस्मसात

वृत्तसंस्था
सोमवार, 10 जुलै 2017

लंडन:  उत्तर लंडनमधील "कॅमडेन लॉर मार्केट' या 42 वर्षांच्या जुन्या बाजापेठेचा काही भाग सोमवारी सकाळी आगीत भस्मसात झाला. या आगीचे स्वरूप मोठे होते. यात मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली असली तरी सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले. ही बाजारपेठ पर्यटकांचे खास आकर्षण आहे.

अग्निशामक दलाचे 70 कर्मचारी व दहा बंब घटनास्थळी पाठविण्यात आल्याचे "लंडन फायर ब्रिगेड'ने (एलएफबी) सांगितले. सुदैवाने आगीत कुणीही जखमी झाले नसल्याचे वृत्त आहे. ""आगीत कोणीही जखमी झालेले नाही. "एलएफबी'ने आग नियंत्रणात आणली आहे. आगीचे कारण मात्र समजू शकलेले नाही. आपत्कालीन यंत्रणेने काम सुरू केले आहे,'' अशी माहिती "स्कॉटलंड यार्ड'ने दिली आहे. आज सकाळी बाजारात आग लागली तेव्हा ती वेगाने सर्वत्र पसरली. त्यामुळे परिसरातील इमारतींना धोका निर्माण झाला होता, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

लंडनमधील प्रसिद्ध पब परिसरातील "हॉवले आर्म'मध्ये फेब्रुवारी 2008 मध्ये आग लागून सहा दुकाने व बाजारातील 90 स्टॉल बेचिराख झाले होते. 2014 मध्ये "कॅमडेन लॉर मार्केट'मधील "स्टेबल्स मार्केट'ला आग लागल्याने 600 नागरिकांनी पलायन केले होते.