ऑक्‍सफर्ड शब्दकोशात भारतीय चना व डाळ

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 जून 2017

लंडनः इंग्रजी शब्दांचे अर्थ समजून घेण्यासाठी शब्दकोशांची मदत होते. सध्या बाजारात विविध शब्दकोश उपलब्ध असले तरी "ऑक्‍सफर्ड इंग्रजी शब्दकोशा'ला जास्त मागणी असते. दरवर्षी नवीन शब्द, स्थानिक शब्द यांची भर घालणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. यंदा या शब्दकोशात नवीन शब्दांची भर पडली आहे. भारतीय पद्धतीच्या आहारात महत्त्वाचे स्थान असलेला "चना' (हरभरा) व "चना डाल' (हरभरा डाळ) या हिंदी शब्दांनी आता "ऑक्‍सफर्ड इंग्रजी शब्दकोशा'त स्थान मिळविले.

ऑक्‍सफर्ड इंग्रजी शब्दकोशा'त दर तीन महिन्यांत नवीन शब्दांचा समावेश केला जातो. रोजच्या जीवनशैलीची निगडित; तसेच अन्य विषयांसह क्रीडा, शिक्षणाशी संबंधित नवनवीन शब्द यात घेतले जातात. या वेळी शब्दकोशात 600 पेक्षा जास्त नवीन शब्दांचा समावेश केला आहे. त्यात "चना' व "चना डाल' हे भारतीय शब्द आहेत. त्याचप्रमाणे टेनिस या खेळात वापरण्यात येणाऱ्या संज्ञा यात आहेत. "फोर्स्ड एरर', "बेगेल' (एकही गेम न गमावता सेट जिंकणे) या टेनिसमधील संज्ञा या शब्दकोशात आहेत. याशिवाय नेहमीच्या वापरातील "वोक' आणि "पोस्ट ट्रूथ' या शब्दांनाही स्थान मिळाले आहे. 2016 च्या "ऑक्‍सफर्ड शब्दकोशा'त "पोस्ट ट्रूथ'ला "वर्ड ऑफ द ईयर' घोषित केले आहे. विशेष म्हणजे यानंतर हा शब्द व्यवहारात जास्त उपयोगात आणला गेला. "वोक' हा शब्दही गेल्या वर्षी "वर्ड ऑफ द ईयर'च्या स्पर्धेत होता. याचा अर्थ आहे सामाजिक भेदभाव किंवा अन्यायाबाबत जागरूक राहणे.

शब्दकोशाचे वैशिष्ट
- 600 पेक्षा जास्त नवे शब्द
- टेनिसमधील संज्ञांचा समावेश
- "पोस्ट ट्रूथ'ला बहुमान