कोण आहे अरियाना ग्रँड?

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 मे 2017

अरियाना ग्रँड ही अमेरिकन पॉप स्टार असून, तिने आपल्या म्युझिकल कारकिर्दीला 'ब्रॉडवे म्युझिकल 13' या पॉप अल्बमने सुरवात केली. अरियाना 23 वर्षांची असून युवकांमध्ये ती खूप लोकप्रिय आहे. अरियाना सध्या जगाच्या दौऱ्यावर आहे.

उत्तर इंग्लंडमधील मँचेस्टर शहराला हादरवून सोडणारे दोन बॉम्बस्फोट हे अमेरिकेची पॉप गायिका अरियाना ग्रँड हिच्या शोमध्ये झाले आहेत. अरियानाने स्फोटानंतर आपण उद्ध्वस्त झाल्याचे सांगत, दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नसल्याचे म्हटले आहे.

मँचेस्टरमधील अरिना येथे पॉप गायिका अरियाना ग्रॅंडच्या म्युझिकल कॉन्सर्टच्या ठिकाणी झालेल्या सोमवारी रात्री दोन स्फोट झाले. या स्फोटात 19 जण ठार तर 50 जण जखमी झाले आहेत. हा दहशतवादी हल्ला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. कॉन्सर्टच्या ठिकाणाची 21 हजार प्रेक्षकांची उपस्थिती होती. अरियानाच्या प्रवक्त्यांनी ती सुखरूप असल्याचे सांगितले आहे.

अरियाना ग्रँड ही अमेरिकन पॉप स्टार असून, तिने आपल्या म्युझिकल कारकिर्दीला 'ब्रॉडवे म्युझिकल 13' या पॉप अल्बमने सुरवात केली. अरियाना 23 वर्षांची असून युवकांमध्ये ती खूप लोकप्रिय आहे. अरियाना सध्या जगाच्या दौऱ्यावर आहे. 'डेंजरस वुमन' असे या दौऱ्याला तिने नाव दिले आहे. इंग्लंडमधील बर्मिंघम आणि डब्लिन शहरांमध्ये तिचे कार्यक्रम झाले आहेत. लंडनमध्ये बुधवारी आणि गुरुवारी तिचे कार्यक्रम होणार होते. पॉपस्टार व्हिटनी होस्टन आणि मरीह कॅरे या अरियाना प्रेरणास्त्रोत आहेत. अरियानाचा समलिंगी संबंधांना पाठिंबा आहे. यासाठी तिने 'ब्रेक युअर हार्ट राईट बॅक' हे गाणे गायिले होते.