चीनमधील स्फोटात सात ठार; 59 जखमी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 जून 2017

बीजिंग - चीनच्या पूर्वेकडील फेंगशियान भागात असलेल्या किंडरगार्डनच्या मुख्य गेटवर झालेल्या एका स्फोटामुळे सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बीजिंग - चीनच्या पूर्वेकडील फेंगशियान भागात असलेल्या किंडरगार्डनच्या मुख्य गेटवर झालेल्या एका स्फोटामुळे सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या स्फोटात अन्य 59 जण जखमी झाले आहेत. सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. त्या वेळी नजीकची शाळा सुटली होती. अनेक पालक आपल्या मुलांना नेण्यासाठी येथे आले होते. जखमींमध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या स्फोटात दोन जणांचा जागीच, तर अन्य पाच जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. स्फोटामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे सरकारी वृत्तवाहिनीने म्हटले आहे. दरम्यान, याबाबतचे अनेक व्हिडिओ व छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.