'एज्युकॉन' परिषदेचे उद्‌घाटन; उच्चशिक्षण क्षेत्रासमोरच्या आव्हानांवर चर्चा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

परिषदेतील चर्चासत्रांनंतर सर्व प्रतिनिधी सिंगापूर येथील नानयांग टेक्‍नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीलाही भेट देणार आहेत.

सिंगापूर : उच्चशिक्षण क्षेत्रासमोरील बदलांच्या आव्हानांवर विचारमंथन घडवून आणणाऱ्या 'एज्युकॉन 2017' परिषदेच्या पहिल्या दिवशी शिक्षणसंस्थांची स्वायत्तता आणि मूल्यांकन आदी विषयांवर चर्चा झाली.

सकाळचे अध्यक्ष प्रतापराव पवार, ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्‍निकल एज्युकेशनचे अध्यक्ष प्रा. अनिल सहस्रबुद्धे, एआयसीटीचे माजी अध्यक्ष एस.एस. मंथा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंगच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि आयआयटी, कानपूरचे माजी संचालक डॉ. संजय धांडे, सकाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप द्विवेदी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी परिषदेचे उदघाटन झाले.

उच्चशिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांना एकत्र आणून उच्चशिक्षण क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या विविध मुद्द्यांवर चर्चा घडवून नव्या दिशा शोधण्याचा प्रयत्न करणारी ही परिषद 'सकाळ माध्यम समूह' गेल्या बारा वर्षांपासून आयोजित करीत आहे. परिषदेतील चर्चासत्रांनंतर सर्व प्रतिनिधी सिंगापूर येथील नानयांग टेक्‍नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीलाही भेट देणार आहेत.

ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
सदाभाऊ यांचा अखेर 'सवतासुभा'
इनक्‍युबेटरचा सरसकट वापर अनावश्‍यक
ओडिशात आघाडी करणार नाही: अमित शहा
फिरोज, ताहीर यांना फाशीची शिक्षा
श्रुती बडोले यांनी शिष्यवृत्ती अर्ज घेतला मागे
उच्चशिक्षण क्षेत्रासमोरच्या आव्हानांवर चिंतन
बैलांच्या शर्यतींबाबतचा मसुदा अंतिम टप्प्यात
तरंगत्या सौर पॅनेलद्वारे 'उजनी'वर ऊर्जानिर्मिती शक्‍य
हिंसाचाराला 'डेरा'चे आर्थिक पाठबळ
कोमलला मिळाले मदतीचे ‘हृदय’