कोरिया द्विपकल्पात युद्ध होणार नाही : मून 

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

सोल : कोरिया द्विपकल्पात कोणत्याही प्रकारचे युद्ध होणार नाही, असे दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जी इन यांनी म्हटले आहे. उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र चाचणीविरोधात अमेरिकेच्या संभाव्य सैन्य कारवाईविरोधात सोलकडे प्रभावी व्हेटो अधिकार आहे, असे मून यांनी या वेळी स्पष्ट केले. दक्षिण कोरियाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास शंभर दिवस पूर्ण झाल्यानिमित्ताने मून पत्रकारांशी बोलत होते. 

ते म्हणाले, की कोरिया युद्धानंतर दक्षिण कोरियातील नागरिकांनी राष्ट्रउभारणीसाठी खूप मेहनत घेतली आहे. कोरिया द्विपकल्पात कोणत्याही परिस्थितीत मी युद्ध होऊ देणार नाही. यासाठी दक्षिण कोरियातील नागरिकांनी युद्ध होणार नाही, या मतावर ठाम राहावे, अशी माझी इच्छा आहे. उत्तर कोरियाच्या वादग्रस्त क्षेपणास्त्र चाचणीमुळे गेल्या काही महिन्यांपासून तणाव वाढला आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने यावर सातव्यांदा बंदी घातली आहे.

सातत्याने दबावाचा सामना करणाऱ्या उत्तर कोरियाने अमेरिकेच्या अधिपत्याखालील ग्वामवर हल्ला करण्याची धमकी दिली होती; मात्र अमेरिकेने कडक पवित्रा घेतल्यानंतर उत्तर कोरियाने माघार घेतल्याचे चित्र आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकादेखील सैनिक कारवाईसाठी सज्ज असल्याचे म्हटले होते.

या पार्श्‍वभूमीवर मून यांनी सोलकडे अमेरिकेच्या सैनिकी कारवाईविरोधात व्हेटोचा प्रभावी अधिकार असल्याचे नमूद केले. आपल्या सहमतीशिवाय कोणीही कोरियाच्या उपखंडात सैनिक कारवाई करण्याचा निर्णय घेऊ शकत नाही. डोनाल्ड ट्रम्प हे उत्तर कोरियावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या वर्तनावरून वाटत नाही की, ते सैनिक कारवाईसाठी इच्छुक आहेत. 

Web Title: marathi news Global News North Korea US Kim Jong Un Donald Trump