कतार वाढविणार नैसर्गिक वायूचे उत्पादन 

पीटीआय
बुधवार, 5 जुलै 2017

दोहा : पुढील काही वर्षांत नैसर्गिक वायूचे उत्पादन 30 टक्‍क्‍यांनी वाढविण्याचा निर्णय कतारने घेतला आहे. काही आखाती देशांकडून बहिष्कार टाकण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर कतारने हा निर्णय घेतला आहे. 

दोहा : पुढील काही वर्षांत नैसर्गिक वायूचे उत्पादन 30 टक्‍क्‍यांनी वाढविण्याचा निर्णय कतारने घेतला आहे. काही आखाती देशांकडून बहिष्कार टाकण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर कतारने हा निर्णय घेतला आहे. 

कतार पेट्रोलियमचे प्रमुख साद शेरिदा अल-काबी म्हणाले, ''नैसर्गिक वायूचे उत्पादन 2024 पर्यंत 10 कोटी टनांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पामुळे नैसर्गिक वायू क्षेत्रात कतारचे आघाडीचे स्थान आणखी भक्कम होईल. यामुळे दीर्घकाळ नैसर्गिक वायू उत्पादनात कतार पहिल्या क्रमांकावर कायम असेल.'' नैसर्गिक वायूचे सर्वाधिक उत्पादन कतारमध्ये होते. सध्या देशात नैसर्गिक वायूचे दरवर्षी उत्पादन 7 कोटी 70 लाख टन आहे. उत्पादन प्रकल्पांचा विस्तार करण्याच्या योजनेमुळे उत्पादन आणखी वाढणार आहे. 

सौदी अरेबियासह सहकारी देशांनी कतारवर गेल्या महिन्यात बहिष्कार टाकला आहे. यामुळे कतारशी या देशांनी राजनैतिक तसेच, अन्य संबंध पूर्णपणे तोडले आहेत. हा बहिष्कार उठविण्यासाठी या देशांनी कतारकडे 13 मागण्या केल्या आहेत. या मागण्या पूर्ण करणे शक्‍य नसल्याचे कतारने याआधीच स्पष्ट केले आहे. 

आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या सहकार्याने नैसर्गिक वायू उत्पादन वाढविण्याची योजना आहे. सौदी अरेबिया आणि सहकारी देशांनी कंपन्यावर दबाव आणून त्यांना प्रतिबंध केल्यासही कतार दहा कोटी टन उत्पादनाचे उद्दिष्ट गाठेलच. 
- साद शेरिदा अल-काबी, प्रमुख, कतार पेट्रोलियम

ग्लोबल

नॅपिडॉ : लष्कराबाबत सौम्य धोरण अवलंबिले असल्याचा आरोप म्यानमारच्या स्टेट कौन्सिलर आंग सान स्यू की यांनी फेटाळून लावला....

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

नोकऱ्यांबाबत काँग्रेस ठरलेले अपयशी, मोदी तर निष्क्रिय: राहुल गांधी न्यूयॉर्क : असहिष्णुता आणि बेरोजगारी ही सध्या भारताच्या...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

मेक्सिको सिटी : मेक्सिकोच्या मध्यवर्ती भागात झालेल्या मोठ्या भूकंपाने संपूर्ण देश हादरला असून, यामध्ये सुमारे दीडशे लोक...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017