मुशर्रफ लष्कर-ए-तोयबाशी युती करणार

parvez
parvez

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आणि माजी लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांनी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत कुख्यात दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा आणि जमात-उद-दावासोबत युती करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच लष्कर-ए-तोयबा आणि जमात-उद-दावा या दोन्ही संघटना राष्ट्रभक्त आहेत, असेही ते म्हणाले.

पाकिस्तानातील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुशर्रफ बोलत होते. ते म्हणाले, इस्लामाबादच्या सुरक्षेसाठी लष्कर-ए-तोयबा आणि जमात-उद-दावा या संघटनांसोबत आघाडी करणार आहोत. या संघटनेतील लोकांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली आहे. या दोन्ही संघटना राष्ट्रभक्त आहेत. तसेच जर लष्कर-ए-तोयबा आणि जमात-उद-दावा या दोन्ही संघटना राजकीय पक्ष स्थापन करत असतील तर त्यांना कोण विरोध करणार असा सवालही त्यांनी विचारला.

दरम्यान, मुशर्रफ यांनी काही दिवसांपूर्वी मी लष्कर-ए-तोयबाचा समर्थक आहे. लष्कर-ए-तोयबा आणि जमात उद दावाचे लोकांना मी आवडतो, असे म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी आता निवडणुकीत या दोन्ही संघटनांशी युती करणार असल्याचे सांगितले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com