दहशतवादी हल्ल्यांत अफगाणमध्ये 23 जण ठार

दहशतवादी हल्ल्यांत अफगाणमध्ये 23 जण ठार

काबूल : अफगाणिस्तानात वेगवेगळ्या हल्ल्यांत शनिवारी सुमारे 23 जणांचा मृत्यू झाला; तर अनेक जण जखमी झाले. सर्वांत मोठा हल्ला पश्‍चिम प्रांतातील फराह येथील सैनिकांच्या तळावर झाला. या ठिकाणी तालिबानच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 18 सैनिक ठार झाले. 

संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते दौलत वजीर म्हणाले, की फराहच्या बालाबुलुक जिल्ह्यातील सैनिकांच्या तळावर मोठा हल्ला झाला. दुर्दैवाने 18 सैनिकांना आम्ही गमावले असून, दोन जवान जखमी झाले आहेत. परिसराची नाकाबंदी केली असून, आणखी सुरक्षा दल तैनात केले आहे. या हल्ल्याची जबाबदारी तालिबानने घेतली आहे. प्रांताचे डेप्युटी गर्व्हनर युनूस रसूली म्हणाले, की प्रशासनाने या हल्ल्याच्या तपासासाठी पथक पाठवले आहे. सैनिक तळावरील हल्ल्यापाठोपाठ काबूलच्या दूतावासाच्या परिसरातही झालेल्या आत्मघाती हल्ल्यात तीन जण ठार; तर पाच जण जखमी झाले. 

अफगाणिस्तानचे उपअंतर्गतमंत्री नसरत राहिमी यांनी सांगितले, की आज सकाळी सुमारे 8.30 च्या सुमारास सुटाबुटात आलेला एक आत्मघाती हल्लेखोर तपासणी नाक्‍यावर दिसला. त्याने स्वत:ला स्फोटाने उडवले. त्यात तीन जण ठार; तर पाच जण जखमी झाले. याशिवाय हेलमंड प्रांतात झालेल्या दोन हल्ल्यांत दोन जवान ठार झाले असून, अनेक जण जखमी झाले.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com