दहशतवादी कारवायांमागे "आयएसआय'

पीटीआय
गुरुवार, 15 जून 2017

वॉशिंग्टन - अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था "आयएसआय' कट रचत असून, हे सगळे पाकिस्तानच्या भूमीतच घडत आहे. दहशतवादी संघटनांच्या माध्यमातून पाकने भारतविरोधात छुपी रणनीती घुसखोरी केली असल्याचा आरोप "वर्ल्ड मुहाजिर कॉंग्रेस'ने केला आहे. भारतातील निर्वासितांची संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "मुहाजिर कॉंग्रेस'ने अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी आणि त्यांच्या दहशतवादविरोधातील लढ्याला पाठिंबा दिला आहे.

पाकिस्तानमधूनच अफगाणिस्तान आणि अन्य देशांमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणले जातात. तालिबान, आयएसआय, अल-कायदा आणि हक्कानी नेटवर्क यांचे माहेरघर हे पाकिस्तानच असल्याचे विविध वृत्त अहवालांतून स्पष्ट होते. दहशतवादी संघटनांना पाकिस्तानचे लष्कर आणि त्यांची गुप्तचर संस्था "आयएसआय'चा पाठिंबा असल्याचे उघड झाले असल्याचे "मुहाजिर कॉंग्रेस'च्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पाकिस्तानातील कराची, हैदराबाद आणि सिंध प्रांतामध्ये 5 कोटी उर्दू भाषिक मुहाजिर राहतात. अमेरिकी सैनिक, नाटो आणि अफगाणिस्तानच्या सैन्यास मुहाजिर कॉंग्रेसने याआधीच पाठिंबा दिला आहे.

मुहाजिर म्हणजे काय?
मुहाजिर हा अरबी भाषेतील शब्द असून, तो मुस्लिम निर्वासितांसाठी वापरला जातो. फाळणीच्या वेळी भारतातून पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्यांना मुहाजिर म्हणून ओळखले जाते. मागील अनेक वर्षांपासून मुहाजिर कॉंग्रेसने भारताला पाठिंबा देत पाकिस्तान सरकारच्या दहशतवादी कारवायांना विरोध केला आहे.

ग्लोबल

नॅपिडॉ : लष्कराबाबत सौम्य धोरण अवलंबिले असल्याचा आरोप म्यानमारच्या स्टेट कौन्सिलर आंग सान स्यू की यांनी फेटाळून लावला....

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

नोकऱ्यांबाबत काँग्रेस ठरलेले अपयशी, मोदी तर निष्क्रिय: राहुल गांधी न्यूयॉर्क : असहिष्णुता आणि बेरोजगारी ही सध्या भारताच्या...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

मेक्सिको सिटी : मेक्सिकोच्या मध्यवर्ती भागात झालेल्या मोठ्या भूकंपाने संपूर्ण देश हादरला असून, यामध्ये सुमारे दीडशे लोक...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017