विमानात एसीच्या वाऱ्यावर तिने सुकविली पँटी !

 International News Moscow Plane AC Air Panty Air Journey
International News Moscow Plane AC Air Panty Air Journey

मॉस्को : इंटरनेटवर सध्या विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. काही गमतीदार असतात तर काही गंभीर स्वरुपाचे असतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक अनोखा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक महिला विमानामध्ये एसीच्या हवेत चक्क पँटी सुकवत असल्याचे दिसत आहे. 

पँटी सुकवण्याचा हा अजब प्रकार मॉस्को विमानात घडला. हे विमान तुर्केतील अंतल्या येथून मॉस्कोच्या दिशेने जात होते. त्यादरम्यान या विमानातून प्रवास करणारी महिला प्रवासी एसीच्या हवेवर पँटी सुकवत असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून दिसत आहे. या अनोख्या अशा प्रकारामुळे सहप्रवासीही अचंबित झाले होते. हा व्हिडिओ युरल एअरलाईन्स विमानात काढण्यात आला. याबाबतचा व्हिडिओ 14 फेब्रुवारी रोजी काढण्यात आला होता. त्यानंतर हा व्हिडिओ रशियाच्या 'द फर्स्ट तुला' या संकेतस्थळावर शेअरही करण्यात आला. 

''या व्हिडिओमध्ये एक महिला प्रवासी पँटी एसीच्या हवेत सुकवत असल्याचे निर्देशनास आले. मात्र, याप्रकारानंतर आम्ही त्या महिलेला काहीही बोललो नाही. ते फक्त शांत झाले होते. तसेच हा प्रकार होत असताना विमानातील सहप्रवासी आश्चर्यचकीत होऊन पाहत होते. मात्र, यातील एकाही प्रवाशाने त्या महिलेला याबाबत काहीही विचारले नाही'', असे 'द फर्स्ट तुला'ला एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com