लष्कराला पाठीशी घालणार नाही : म्यानमारच्या नेत्या स्यू की

पीटीआय
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

नॅपिडॉ : लष्कराबाबत सौम्य धोरण अवलंबिले असल्याचा आरोप म्यानमारच्या स्टेट कौन्सिलर आंग सान स्यू की यांनी फेटाळून लावला. म्यानमारच्या लष्कर प्रमुखांबरोबर आपले चांगले संबंध असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

म्यानमारच्या लष्कराकडून रोहिंग्या मुस्लिमांचे शिरकाण केले जात असल्याचा आरोप संयुक्त राष्ट्रांकडून (यूएन) करण्यात आला होता. लष्कराबरोबर सलोख्याचे संबंध ठेवून देशाची प्रगती करण्याला आपण प्राधान्य दिले आहे, असे स्यू की म्हणाल्या. 

स्यू की यांनी मंगळवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात रोहिंग्या मुस्लिमांच्या मुद्यावर प्रथमच भाष्य केले होते. मात्र, या संबोधनामध्ये आंतराराष्ट्रीय पातळीवरून होत असलेल्या आरोपांना थेट उत्तर देण्याचे स्यू की यांनी टाळले होते. या भाषणानंतर स्यू की यांनी बुधवारी रेडिओ फ्री एशियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये लष्कराबाबतच्या आरोपांना थेट उत्तर दिले. म्यानमारच्या लष्कराबाबत सौम्य भूमिका घेतली जात असल्याच्या यूएनच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर स्यू की यांनी या मुलाखतीमध्ये आपली भूमिका विशद केली. त्या म्हणाल्या की, आम्ही आमच्या भूमिकेत कुठलाही बदल केलेला नाही. लष्कराबाबत सौम्य भूमिका घेतली जात असल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. देशाला प्रगतीकडे घेऊन जाण्यावर आमचा सुरवातीपासून भर आहे. लष्करावर आम्ही टीका करत नाही, मात्र लष्कराच्या चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जात नाही. लष्कराला पाठीशी घातले जात नाही. 

लोकशाहीच्या समर्थक असलेल्या स्यू की यांना लष्कराकडून सुरवातीपासून विरोध केला जात आहे. लष्कराने तयार केलेली घटना बदलण्याचा स्यू की यांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला होता. याच घटनेनुसार अध्यक्षपद स्वीकारण्यास स्यू की यांना अपात्र ठरविण्यात आले होते. सुरक्षेबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार लष्कराकडे आहेत. 

लष्कराच्या विरोधात मी आधीही कठोर भूमिका घेतली होती आणि या पुढेही ती कायम असेल, असे स्यू की म्हणाल्या. अराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मी या रोहिंग्या मुस्लिमांचे समर्थन करणाऱ्या दहशतवादी संघटनेने मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करून रोहिंग्या दहशतवाद्यांच्या विरोधात म्यानमारच्या लष्कराने मोहीम उघडली आहे, असे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले. 

अमेरिकेचे उपसहायक परराष्ट्रमंत्री पॅट्रिक मुर्फी हे म्यानमारच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज स्यू की यांची भेट घेतली. हिंसाचार उसळलेल्या राखीन राज्यालाही ते भेट देणार असल्याचे सांगण्यात आले. 

रोहिंग्या निर्वासितांना परत म्यानमारमध्ये प्रवेश देण्यास आंग सान स्यू की यांनी तयारी दर्शविली असून, या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. हिंसाचाराची झळ बसलेल्यांना आता तातडीने मदत पुरवण्यात यावी. 
- रेक्‍स टिलरसन, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री