भ्रष्टाचारविरोधी न्यायालयात नवाज शरीफ यांची हजेरी 

वृत्तसंस्था
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

इस्लामाबाद : भ्रष्टाचारविरोधी विभागाच्या (एनएबी) विशेष न्यायालयात आज झालेल्या सुनावणीवेळी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी हजेरी लावली. शरीफ यांच्यासोबत त्यांची मुलगी मरियम आणि जावई मोहम्मद सफदर हेही न्यायालयात उपस्थित होते. न्यायालयाने आज सुनावणी तहकूब केली. याप्रकरणी उद्या (ता. 8) सुनावणी घेण्यात येणार आहे. 

नवाज शरीफ यांच्या विरोधात सध्या तीन प्रकरणांची सुनावणी सुरू आहे. या तिन्ही प्रकरणांची एकत्रित सुनावणी करण्याची मागणी शरीफ यांनी न्यायालयाकडे केली आहे. तिन्ही प्रकरणांची एकत्रित सुनावणी घेण्याचे आदेश इस्लामाबाद उच्च न्यायालयाने मागील आठवड्यात दिले होते.

खालच्या न्यायालयाच्या निर्णयावर विचार करण्यास "एनएबी'च्या विशेष न्यायालयाने आज संमती दर्शविली. तिन्ही याचिकांमध्ये करण्यात आलेले आरोप सारखेच असल्यामुळे त्यांची एकत्रित सुनावणी घेण्याचा युक्तिवाद शरीफ यांच्या वकिलांनी आज केला. त्यावर उद्या (ता. 8) पर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आली.

शरीफ यांच्या मागणीवर उद्या (ता. 8) निर्णय जाहीर केला जाण्याची शक्‍यता आहे.